Ketan Agarwal News : वकिलाने आरोपीच्या भावाला पाठवली १० कोटींची अब्रूनुकसानीची नोटीस
साहिलने माध्यमांसमोर वकिलांच्या अधिकारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत "धमकी" दिल्याचा खोटा आरोप केल्याचा दावा
2 मिनिट वाचन

पुणे, Maharashtra Mirror :
शहरातील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणाला आता एक नवीन वळण मिळाले आहे. मुख्य आरोपी सिया गोयल हिचे वकील ॲडव्होकेट आशुतोष श्रीवास्तव यांनी सियाचा भाऊ साहिल गोयल याला १० कोटी रुपयांची अब्रूनुकसानीची कायदेशीर नोटीस पाठवली आहे. साहिल गोयलने माध्यमांसमोर वकिलांच्या अधिकारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत "धमकी" दिल्याचा खोटा आरोप केल्यामुळे ही नोटीस बजावण्यात आली आहे. Ketan Agarwal News
२६ वर्षीय व्यावसायिक केतन अग्रवाल यांचा १८ जून रोजी लोहगड किल्ल्यावरून पडून मृत्यू झाला होता. याप्रकरणी त्यांची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांना पोलिसांनी अटक केली आहे. अलीकडेच एका कॅब ड्रायव्हरच्या दाव्यानंतर या प्रकरणाची चर्चा माध्यमांमध्ये वाढली असतानाच, साहिल गोयलने माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत श्रीवास्तव यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला होता. पुणे, Maharashtra Mirror :
शहरातील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणाला आता एक नवीन वळण मिळाले आहे. मुख्य आरोपी सिया गोयल हिचे वकील ॲडव्होकेट आशुतोष श्रीवास्तव यांनी सियाचा भाऊ साहिल गोयल याला १० कोटी रुपयांची अब्रूनुकसानीची कायदेशीर नोटीस पाठवली आहे. साहिल गोयलने माध्यमांसमोर वकिलांच्या अधिकारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत "धमकी" दिल्याचा खोटा आरोप केल्यामुळे ही नोटीस बजावण्यात आली आहे. Ketan Agarwal News
या आरोपांचे खंडन करत ॲड. श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले की, सिया गोयल ही सज्ञान असून तिने स्वतःच्या इच्छेने वकिलीपत्र (वकालतनामा) स्वाक्षरित केले आहे, जे पुणे येथील वडगाव मावळ न्यायालयात सादर करण्यात आले आहे. साहिलच्या विधानांमुळे आपल्या व्यावसायिक प्रतिष्ठेला धक्का पोहोचल्याचा दावा त्यांनी केला आहे. या नोटीसद्वारे साहिलला ४८ तासांच्या आत बिनशर्त माफी मागण्यास, आणि ७ दिवसांत १० कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्यास सांगण्यात आले आहे. असे न केल्यास भारतीय न्याय संहिता, २०२३ अंतर्गत फौजदारी व दिवाणी कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. पुणे, Maharashtra Mirror :
शहरातील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणाला आता एक नवीन वळण मिळाले आहे. मुख्य आरोपी सिया गोयल हिचे वकील ॲडव्होकेट आशुतोष श्रीवास्तव यांनी सियाचा भाऊ साहिल गोयल याला १० कोटी रुपयांची अब्रूनुकसानीची कायदेशीर नोटीस पाठवली आहे. साहिल गोयलने माध्यमांसमोर वकिलांच्या अधिकारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत "धमकी" दिल्याचा खोटा आरोप केल्यामुळे ही नोटीस बजावण्यात आली आहे. Ketan Agarwal News
प्रसिद्ध विधितज्ञ आशुतोष श्रीवास्तव यांच्याकडून सिया गोयलच्या भावाला मानहानी 'नोटीस': साहिल गोयलच्या अडचणीत वाढ https://www.instagram.com/p/DaM288SNUir
हेही वाचा: CRIME NEWS : केतन अगरवाल हत्या प्रकरणाचा तपासाने घेतला वेग




