मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Kavediya Jewelers News | कावेडिया ज्वेलर्सला कोट्यावधींचा गंडा घालणारा स्टोर मॅनेजर गजाआड !

तब्बल ४ किलो ७०० ग्रॅम सोन्याची अफरातफर मुद्देमाल प्रकरणी अनेक सराफा व्यावसायिकांची चौकशी ?

M
mubarak

1 मिनिट वाचन

kavediya jewlers

  • तब्बल ४ किलो ७०० ग्रॅम सोन्याची अफरातफर
  • मुद्देमाल प्रकरणी अनेक सराफा व्यावसायिकांची चौकशी ?
  • पुणे, दि. २३ ऑक्टोबर, मुबारक जिनेरी
    महाराष्ट्र मिरर
    Kavediya Jewelers News

    Kavediya Jewelers News | रविवार पेठ, गोविंद हलवाई चौकात सुवर्ण पेढीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या कावेडिया ज्वेलर्स येथे विश्वासू स्टोर मॅनेजरकडूनच कोट्यावधीचे सोने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. कोट्यावधींचा गंडा घालणारा स्टोर मॅनेजरला पुणे पोलिसांनी गजाआड केले आहे.

    याप्रकरणी संशयित आरोपी स्टोर मॅनेजर विपुल कांतीलाल गुंदेचा, वय ४६ वर्ष, रा. सूर्य प्रकाश सोसायटी, मार्केटयार्ड पुणे याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. Kavediya Jewelers News

    कावेडिया ज्वेलर्सचे फिर्यादी संचालक नितीन पुष्पराज कावेडिया यांनी ४ किलो ७०० ग्रॅम सोने चोरी झाल्याबाबत फरासखाना पोलिसांकडे तक्रार दिली होती. यावरून गुरन. २१९/२०२४ बीएनएस ३०६ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला होता.

    संशयित आरोपी विपुल गुंदेचा याने मुद्देमाल कोणाला विक्री केला याबाबत पोलीस तपास करीत असल्याचे सूत्रांकडून समजते.

    हेही वाचा: Pune Bribe News : महावितरणाच्या लाचखोर अधिकाऱ्याला एसीबीचा "झटका", दोन लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

    शेअर करा