मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : कौसरबाग येथील अतिक्रमणे कधी हटवणार?

Pune News पुणे, धनश्री ओतारी : कोंढवा आणि कौसरबाग परिसरातील सार्वजनिक रस्ते आणि पदपथांवर झालेल्या बेकायदेशीर अतिक्रमणांवर तातडीने आणि कडक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नगरसेवक काशिफ फखरुल सय्यद यांनी केली आहे.

VK
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

कौसरबाग येथील अतिक्रमणे कधी हटवणार? नगरसेवक काशिफ सय्यद यांची हायकोर्टाच्या आदेशानंतर त्वरित कारवाईची मागणी; प्रशासनाने केवळ नोटिसा देऊन प्रत्यक्ष कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा
कौसरबाग येथील अतिक्रमणे कधी हटवणार? नगरसेवक काशिफ सय्यद यांची हायकोर्टाच्या आदेशानंतर त्वरित कारवाईची मागणी; प्रशासनाने केवळ नोटिसा देऊन प्रत्यक्ष कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा

Pune News : नगरसेवक काशिफ सय्यद यांची हायकोर्टाच्या आदेशानंतर त्वरित कारवाईची मागणी; प्रशासनाने केवळ नोटिसा देऊन प्रत्यक्ष कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा

Pune News पुणे, धनश्री ओतारी : कोंढवा आणि कौसरबाग परिसरातील सार्वजनिक रस्ते आणि पदपथांवर झालेल्या बेकायदेशीर अतिक्रमणांवर तातडीने आणि कडक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नगरसेवक काशिफ फखरुल सय्यद यांनी केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या एका महत्त्वाच्या आदेशाचा दाखला देत, सय्यद यांनी आयोजित पत्रकार परिषदेत अनधिकृत व्यावसायिक बांधकामे, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आणि फ्रंट-साइड मार्जिनचा गैरवापर करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्याचे प्रशासनाला आवाहन केले./maharashtramirror.com Pune News

परिसरातील वाहतुकीचा मोठा खेळखंडोबा


पत्रकार परिषदेत बोलताना सय्यद यांनी आरोप केला की, कौसरबाग आणि आसपासच्या भागात अनधिकृत तात्पुरते व पक्के शेड, तसेच पदपथांवर उघडलेली दुकाने यामुळे परिसरातील वाहतुकीचा मोठा खेळखंडोबा झाला आहे. या अतिक्रमणांमुळे रुग्णवाहिका आणि अग्निशामक दलाच्या गाड्यांसारख्या आपत्कालीन सेवांना रस्ता मिळणे कठीण झाले असून, नागरिकांचा जीव धोक्यात येत आहे.maharashtramirror.com Pune News

२० मीटरचे रस्ते झाले १६ मीटरचे


विकास आराखड्यानुसार (डीपी) मंजूर असलेले मुख्य रस्ते अतिक्रमणामुळे अत्यंत अरुंद झाले असल्याचे सय्यद यांनी निदर्शनास आणून दिले. यामध्ये कौसरबाग ते वेलकम हॉल / पारगे नगर रस्ता, ब्रह्मा एक्झुबरन्स रोड ते कूल होम परिसर, शीतल पेट्रोल पंप ते ज्योती चौक रस्ता हे रस्ते कागदावर सुमारे २० ते २२ मीटर रुंद असताना, प्रत्यक्षात ते १६ ते १७ मीटरपर्यंत अरुंद झाले आहेत. रस्त्याची उरलेली जागा आणि पादचाऱ्यांचे हक्काचे फूटपाथ नेमके गेले कुठे? असा थेट सवाल सय्यद यांनी पालिकेच्या कारभारावर उपस्थित केला. https://maharashtramirror.com/ Pune News

न्यायालयीन स्थगिती आदेशांचा गैरवापर आणि हायकोर्टाचे निर्देश


मुंबई उच्च न्यायालयात दाखल रिट याचिका क्र. ९३२९/२०२६ संदर्भात बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, न्यायालयाने रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवणे आणि पदपथ नागरिकांसाठी मोकळे ठेवणे ही महापालिकेची प्राथमिक जबाबदारी असल्याचे नमूद केले आहे. अनेक व्यावसायिकांनी गेल्या काही वर्षांत न्यायालयाच्या स्थगिती आदेशांचा गैरवापर करून बेकायदेशीर बांधकामे वाचवली असल्याचा आरोप करत, नियमानुसार नोटीस बजावून तात्काळ प्रत्यक्ष कारवाई करावी, असे सय्यद म्हणाले.

तसेच, रस्त्यावर उघड्यावर सुरू असलेल्या स्वयंपाक व शेड बांधकामामुळे भीषण आगीची दुर्घटना घडण्याची शक्यता असून, या संपूर्ण 'अतिक्रिमण नेटवर्क'ची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) आणि नगरविकास खात्यामार्फत उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.

लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशारा


या सामाजिक व नागरी प्रश्नावर वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारांना धमकावण्याचे किंवा त्यांच्यावर दबाव आणण्याचे प्रयत्न सहन केले जाणार नाहीत, असे सांगत सय्यद यांनी प्रसारमाध्यमांना पूर्ण पाठिंबा दर्शवला. महापालिका प्रशासनाने केवळ नोटिसा बजावण्याचे सोपस्कार न उरकवता प्रत्यक्ष कारवाई केली नाही, तर नागरिकांना सोबत घेऊन लोकशाही व न्यायालयीन मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला. विकास आराखड्यानुसार कौसरबागचे रस्ते आणि पदपथ मोकळे होईपर्यंत हा लढा सुरूच राहील, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.
महत्वाचे मुद्दे
*परिसरातील सार्वजनिक रस्ते आणि पदपथांवर झालेल्या बेकायदेशीर अतिक्रमणांवर तातडीने आणि कडक कारवाई करण्याची स्थानिक नगरसेवकांची मागणी
*सय्यद यांनी मुंबई उच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या एका महत्त्वाच्या आदेशाचा दिला दाखला
*अनधिकृत व्यावसायिक बांधकामे, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आणि फ्रंट-साइड मार्जिनचा गैरवापर करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचे प्रशासनाला आवाहन
*अतिक्रमणांमुळे रुग्णवाहिका आणि अग्निशामक दला सारख्या आपत्कालीन सेवांना रस्ता मिळणे कठीण, नागरिकांचा जीव धोक्यात
*विकास आराखड्यानुसार (डीपी) मंजूर असलेले मुख्य रस्ते अतिक्रमणामुळे झाले अत्यंत अरुंद

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा