मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Kalyan Sex Racket : हॉटेलमध्ये देहविक्रीचा गोरखधंदा उघड! महिला दलाल जेरबंद, चार पिडीतांची सुटका

Kalyan Latest Sex Racket News : अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाची गुप्त माहितीवर कारवाई; कल्याण फाट्यावर सापळा रचून दलाल महिला अटकेत

V
Vivek

1 मिनिट वाचन

Nalasopara Sex Racket

Kalyan Latest Sex Racket News : अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाची गुप्त माहितीवर कारवाई; कल्याण फाट्यावर सापळा रचून दलाल महिला अटकेत

कल्याण | कल्याण फाट्यावरील 'हॉटेल शुभम कम्फर्ट रेस्टॉरंट'मध्ये चालणाऱ्या देहविक्रीच्या गोरखधंद्याचा भांडाफोड करत ठाणे गुन्हे शाखेच्या Thane Crime Branch अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एक महिला दलाल अटकेत असून, तिच्या तावडीतून चार असहाय्य महिलांची सुटका करण्यात आली आहे.

27 जून 2025 रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे ही धडक कारवाई करण्यात आली. महिला दलाल पिडीत महिलांना फूस लावून वेश्या व्यवसायासाठी वापरणार असल्याची गुप्त खबर मिळाल्यावर पोलिसांनी तत्काळ सापळा रचत छापा टाकला.

छाप्यात महिला दलालास रंगेहात अटक करण्यात आली असून तिच्या ताब्यातून चार पिडीत महिलांना सोडवण्यात आले आहे.

या प्रकरणी डायघर पोलीस ठाण्यात, भारतीय दंड विधान कलम 143(1), 143(3) आणि अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 अंतर्गत कलम 4 व 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महिलेला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.

अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे,विनय घोरपडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (प्रतिबंध), गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी, महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहल शिंदे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वालगुडे, पोलीस हवालदार किशोर पाटील, सुवारे, महिला पोलीस अंमलदार खरात, थोरात, व्ही.बी.यादव , पोलीस शिपाई पाटील यांनी यशस्वीपणे पार पाडलेली आहे.

हेही वाचा: Mumbai Drug News : मुंबईत 21 कोटींचा 'हायड्रो गांजा' जप्त! दोन परदेशी ड्रग तस्कर अटकेत

शेअर करा