मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai Drug News : मुंबईत 21 कोटींचा 'हायड्रो गांजा' जप्त! दोन परदेशी ड्रग तस्कर अटकेत

Mumbai Oshiwara Police Latest News : ओशिवरा पोलिसांची कारवाई; इंडोनेशियातून आलेले दोघे नायजेरियन टोळीशी संबंधीत असल्याची शक्यता

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai Drug News: 'Hydro Ganja' worth 21 crores seized in Mumbai! Two foreign drug smugglers arrested

Mumbai Oshiwara Police Latest News : ओशिवरा पोलिसांची कारवाई; इंडोनेशियातून आलेले दोघे नायजेरियन टोळीशी संबंधीत असल्याची शक्यता

मुंबई | मुंबईत अंमली पदार्थांच्या साखळीवर ओशिवरा पोलिसांनी मोठा घाव घालत आंतरराष्ट्रीय बाजारात 21 कोटींहून अधिक किंमत असलेल्या 21 किलो 552 ग्रॅम हायड्रो गांजाची जप्ती केली आहे. या कारवाईत इंडोनेशियाचे दोन नागरिक अटकेत घेतले असून, त्यांच्यावर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Mumbai Oshiwara Police Latest News

27 जून 2025 रोजी ओशिवरा पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाणावली, पोलीस निरीक्षक मानकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक कदम यांच्या पथकाला खबऱ्याकडून माहिती मिळाली की, जोगेश्वरी पश्चिम परिसरात एक व्यक्ती मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ घेऊन येणार आहे. माहितीच्या आधारे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचून धाड टाकली.

जोगेश्वरीतील धडक छाप्यात 21 किलोपेक्षा अधिक वजनाचा उच्च प्रतीचा 'हायड्रो गांजा' हस्तगत

छाप्यात Budi Wiyono (वय 44) आणि Rakhmat Ardi Hidayat (वय 39) या इंडोनेशियन नागरिकांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एकूण 21.552 किलो वजनाचा 'हायड्रो गांजा' जप्त करण्यात आला आहे, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील अंदाजे किंमत 21 कोटी 55 लाख 20 हजार इतकी असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

या प्रकरणी ओशिवरा पोलिस ठाण्यात Mumbai Oshiwara Police Latest News एन.डी.पी.एस. ॲक्ट 1985 च्या कलम 8(क), 20(ब)ii(क) व 29 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अटक आरोपींकडून अधिक माहिती घेण्यासाठी तपास सुरू असून, हे दोघे आंतरराष्ट्रीय ड्रग नेटवर्कचा भाग आहेत का, याचा तपास मुंबई पोलिस करत आहेत.

शेअर करा