मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune Crime : पंढरपूरला जाणाऱ्या एसटी बसमधून ५.६० लाखांचे दागिने लांबवले

Pune Crime : पुणे, महाराष्ट्र मिरर : पुणे-पंढरपूर मार्गाने प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसमधून अज्ञात चोरट्याने ५ लाख ६० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची बॅग पळवल्याची घटना घडली आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

पंढरपूरला जाणाऱ्या एसटी बसमधून ५.६० लाखांचे दागिने लांबवले जेजुरीतील हॉटेलसमोरील घटना
पंढरपूरला जाणाऱ्या एसटी बसमधून ५.६० लाखांचे दागिने लांबवले जेजुरीतील हॉटेलसमोरील घटना

Pune Crime : जेजुरीतील हॉटेलसमोरील घटना

Pune Crime : पुणे, महाराष्ट्र मिरर : पुणे-पंढरपूर मार्गाने प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसमधून अज्ञात चोरट्याने ५ लाख ६० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची बॅग पळवल्याची घटना घडली आहे. जेजुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत साकुर्डे गावाजवळ असलेल्या एका हॉटेलसमोर बस थांबली असताना हा प्रकार घडला.https://maharashtramirror.com/ Pune Crime

चहा-पाण्यासाठी उतरले अन् बॅगेतून सोने गायब

देहू रोड (विकास नगर, ता. हवेली) येथील रहिवासी मनीषा बापूसाहेब पाटील (वय ५१) या आपली सून क्रांती हिच्यासह २६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९:१५ च्या सुमारास पंढरपूर येथे जेवणाच्या कार्यक्रमासाठी निघाल्या होत्या. त्यांनी वल्लभनगर ते पंढरपूर या एसटी बसने प्रवास सुरू केला होता. दुपारी बारा-साडेबाराच्या सुमारास साकुर्डे गावच्या हद्दीतील 'हॉटेल आईसाहेब'समोर जेवणाकरिता बस थांबली असता मनीषा पाटील आणि त्यांची सून चहा-पाण्यासाठी बसमधून खाली उतरल्या होत्या. याच संधीचा फायदा घेऊन अज्ञात भामट्याने त्यांच्या बसमधील बॅगेत ठेवलेले ५ लाख ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अत्यंत लबाडीने चोरून नेले.https://maharashtramirror.com/ Pune Crime
चोरीला गेलेल्या दागिन्यांमध्ये अडीच लाख रुपये किमतीचे ५ तोळे वजनाचे सोन्याचे गंठण, २ लाख १५ हजार रुपये किमतीचे ४३ ग्रॅम वजनाचे गंठण आणि ९५ हजार रुपये किमतीचा १९ ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस अशा एकूण ५ लाख ६० हजार रुपयांच्या दागिन्यांचा समावेश आहे.
प्रवासाहून परतल्यानंतर मनीषा पाटील यांनी ३१ ऑगस्ट २०२६ रोजी जेजुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता, कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार पखाले हे करत आहेत.

शेअर करा