मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Jejuri Accident : 'मदतीची घोषणा केवळ कागदावरच?', रोहित पवारांचा सरकारवर थेट निशाणा

पुणे, महाराष्ट्र मिरर

DO
Dhanshree Otari

2 मिनिट वाचन

Jejuri Accident

Jejuri Accident : जुन्या घटनेचा दाखला देत व्यक्त केला संताप

पुणे, महाराष्ट्र मिरर

Jejuri Accident : जेजुरी येथील अपघाताची घटना समोर येताच आणि राज्य सरकारकडून ५ लाख रुपयांच्या मदतीची घोषणा झाल्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) आमदार रोहित पवार यांनी महायुती सरकारवर अत्यंत बोचरी टीका केली आहे. सरकारच्या वतीने वारीमधील सुरक्षिततेचे दावे आणि जाहीर होणारी आर्थिक मदत वेळेत पोहोचत नसल्याची वस्तुस्थिती मांडत रोहित पवारांनी प्रशासकीय दिरंगाईवर गंभीर सवाल उपस्थित केले आहेत. ( Jejuri Accident rohit pawar criticizes government )

Jejuri road accident : वारीच्या वाटेवर काळाचा घाला;  ३ महिला वारकऱ्यांचा मृत्यू

आमदार रोहित पवार यांनी ट्विट आणि जाहीर विधानाच्या माध्यमातून सरकारला मागील वर्षीच्या एका घटनेची आठवण करून दिली. ते म्हणाले, "पंढरपूरला जाताना अपघाती निधन झालेल्या वारकऱ्यांच्या वारसांना ‘विठ्ठल रखुमाई वारकरी योजना – २०२५’ अंतर्गत ४ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने मागील वर्षी घेतला होता. मात्र, प्रत्यक्षात चित्र अत्यंत उदासीन आहे." ( Jejuri Accident )

पुण्यतिथी आली तरी मदत मिळेना
वडगाव (ता. खटाव, जि. सातारा) येथील श्री जयराम स्वामी मठाच्या दिंडीतील दशरथ माने यांच्यासह मधुकर शेंडे आणि तुषार बावनकुळे या तीन वारकऱ्यांचा मागील वारीत अपघाती मृत्यू झाला होता. रोहित पवार यांनी नमूद केले की, "या तिन्ही मृत वारकऱ्यांची पुण्यतिथी जवळ आली, तरी अद्याप त्यांच्या वारसांना राज्य सरकारकडून हक्काची आर्थिक मदत मिळालेली नाही. ही सरकारची अक्षम्य दिरंगाई आहे."

आज जेजुरीजवळ झालेल्या अपघातातील मृतांच्या वारसांना शासनाने केवळ घोषणा न करता तातडीने मदत सुपूर्द करावी, अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील मृत वारकऱ्यांच्या प्रलंबित मदतीचा उल्लेख करत त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनाही यामध्ये वैयक्तिक लक्ष घालण्याची विनंती केली आहे. "बावनकुळे साहेब आपण यामध्ये व्यक्तीशः लक्ष घालावं आणि त्या गरिबांच्या कुटुंबांना न्याय मिळवून द्यावा," असे आवाहन रोहित पवार यांनी केले आहे. या राजकीय टीकेमुळे वारीतील अपघात आणि वारकऱ्यांच्या विम्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ( Jejuri Accident )

मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत

आज सकाळी सासवड–जेजुरी मार्गावरील जेजुरी-बेलसर परिसरात झालेल्या अपघातात तीन वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर काही वारकरी जखमी झाले असून या अपघातात मृत्यू झालेल्या वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत तर जखमी वारकऱ्यांवर शासनाच्यावतीने मोफत उपचार करण्यात येतील. तसेच आवश्यकतेनुसार आर्थिक मदतही उपलब्ध करून देण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज दिले. ( Jejuri Accident )

यावेळी जेजुरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष जयदीप दिलीप बारभाई, उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रम राजपूत, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ गुरु शांतीनाथ, भावार्थ देखणे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Pune Murder : पुण्यातील धनकवडीत मद्यपानाच्या वादातून निर्घृण खून

जखमी वारकऱ्यांच्या उपचारामध्ये कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. शासन अपघातग्रस्त वारकरी व त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. ( Jejuri Accident )

आषाढी वारीच्या पूर्वतयारीचा नियमित आढावा घेऊन वारी मार्गावरील आवश्यक कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या होत्या. पंढरपूरच्या दिशेने पायी निघालेल्या वारकऱ्यांची सुरक्षितता ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असून वाहनचालकांनी अत्यंत सावधगिरीने वाहन चालवून वारकऱ्यांच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहनही उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.

View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)

शेअर करा