Jejuri road accident : वारीच्या वाटेवर काळाचा घाला; ३ महिला वारकऱ्यांचा मृत्यू
जेजुरी, महाराष्ट्र मिरर
2 मिनिट वाचन

Jejuri road accident: सासवड–जेजुरी मार्गावर सोमवारी सकाळी एका भरधाव ट्रकने पायी जाणाऱ्या महिला वारकऱ्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली.
जेजुरी, महाराष्ट्र मिरर
Jejuri road accident : आषाढी वारीच्या पवित्र आणि उत्साही वातावरणात पुणे जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक व धक्कादायक बातमी समोर आली आहे. सासवड–जेजुरी मार्गावर सोमवारी सकाळी एका भरधाव ट्रकने पायी जाणाऱ्या महिला वारकऱ्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तीन महिला वारकऱ्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून, अन्य चार महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमींची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर जेजुरी येथील रुग्णालयात अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत. ( jejuri road accident three warkari death )
मिळालेल्या माहितीनुसार, हा भीषण अपघात सासवड-जेजुरी मार्गावरील बेलसर टोल नाक्यापासून जेजुरीच्या दिशेने सुमारे ५०० मीटर अंतरावर असलेल्या भोंगळे मळा परिसरात घडला. येथील हॉटेल शिपदीप लॉजिंगसमोरून काही महिला वारकरी रस्त्यावरून पायी मार्गक्रमण करत असताना पाठीमागून आलेल्या दिंडीच्या एका ट्रकने त्यांना भीषण धडक दिली. हा अपघात इतका भयानक होता की, धडक बसताच तीन महिलांचा घटनास्थळीच जीव गेला, तर इतर चार महिला रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. अपघात होताच परिसरात एकच खळबळ उडाली आणि वारीतील इतर वारकऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली.

प्राथमिक तपासानुसार, हा अपघात नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील 'रंगनाथ महाराज पोखरबिसीकर दिंडी'चा ट्रक आणि सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज येथील दिंडीतील महिला वारकरी यांच्यात झाला. अपघातावेळी सात महिला वारकरी रस्त्यावरून नियमाप्रमाणे पायी चालत जात होत्या. याच दरम्यान 'ताठे महाराज भोशीकर दिंडी' (ता. कंधार, जि. नांदेड) शी संबंधित असलेला ट्रक (चालक: बालाजी एकनाथ डक, वय ६३, रा. पिंपळगाव, जि. नांदेड) तेथून जात होता आणि चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे. Jejuri road accident
View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)
या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या तिन्ही महिला सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील रहिवासी आहेत. नंदा पवार (वय ६० वर्षे, रा. कवलापूर, ता. मिरज, जि. सांगली) माधवी राजाराम सलगरे (वय ५५ वर्षे, रा. मालगाव, ता. मिरज, जि. सांगली) राजश्री शंकर भोसले (वय ५५ वर्षे, रा. कसबे डिग्रज, ता. मिरज, जि. सांगली) असे मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहेत.

या अपघातात गंभीर जखमी झालेल्या इतर चार महिला वारकऱ्यांना स्थानिक नागरिकांच्या व पोलिसांच्या मदतीने तातडीने जेजुरी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या आयसीयूमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.
View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)
घटनेची माहिती मिळताच जेजुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी, स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणेचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य राबवून जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले. अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजूला करेपर्यंत सासवड–जेजुरी मार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे विस्कळीत झाली होती; मात्र पोलिसांनी तात्काळ पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी (Post-Mortem) शासकीय रुग्णालयात पाठवले आणि वाहतूक पूर्ववत केली. Jejuri road accident
Zp School : पुणे जिल्ह्यातील ग्रामीण शाळा आता सकाळच्या सत्रात भरणार
सुनेत्रा पवार यांच्याकडून जखमींची विचारपूस
या भीषण अपघाताची माहिती मिळताच राजकीय आणि सामाजिक स्तरातून तीव्र दुःख व्यक्त केले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांनी तात्काळ जेजुरी येथील रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी जखमी वारकऱ्यांची आणि त्यांच्या नातेवाईकांची भेट घेऊन विचारपूस केली, तसेच डॉक्टरांशी चर्चा करून जखमींना सर्वोत्कृष्ट वैद्यकीय उपचार मिळतील याची खात्री केली. Jejuri road accident

वारीच्या मार्गावर वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, जड वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याची मागणी वारकऱ्यांमधून केली जात आहे. पोलीस या प्रकरणी ट्रक चालक बालाजी डक याच्यावर गुन्हा दाखल करत पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.




