मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

सदाशिव पेठेतील वीज यंत्रणेला लागलेल्या आगीची चौकशी करा

सजग नागरिक मंचाची मागणी; २७ एप्रिलला सुमारे ४०० वीज ग्राहकांची तब्बल २५ तास वीजपुरवठा खंडित

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

सदाशिव पेठेतील वीज यंत्रणेला लागलेल्या आगीची चौकशी करा

सजग नागरिक मंचाची मागणी; २७ एप्रिलला सुमारे ४०० वीज ग्राहकांची तब्बल २५ तास वीजपुरवठा खंडित

या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी गेल्या वर्षभरात याच ठिकाणी लागलेली ही दुसरी आग असल्याने सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत

निलेश राऊत
पुणे:
महावितरणच्या सदाशिव पेठेतील अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयाजवळील वीज यंत्रणेला २७ एप्रिल रोजी लागलेल्या आगीच्या घटनेची तातडीने सखोल तांत्रिक चौकशी करावी, अशी मागणी सजग नागरिक मंचाने केली आहे. या आगीत सुमारे ४०० वीज ग्राहकांना तब्बल २५ तास वीजपुरवठा खंडित झाल्याने अंधारात राहावे लागले होते.

या संदर्भात मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी पुणे विद्युत निरीक्षक यांना पत्र दिले आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी गेल्या वर्षभरात याच ठिकाणी लागलेली ही दुसरी आग असल्याने सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

ही आग नेमकी कशामुळे लागली, यामागे तांत्रिक बिघाड, देखभाल-दुरुस्तीतील त्रुटी, अपुरी व्हेंटिलेशन व्यवस्था किंवा संबंधित अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा कारणीभूत आहे का, याची सखोल पडताळणी करून अहवाल जाहीर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

महावितरणच्या वीज यंत्रणांमध्ये सुरक्षेचे मानदंड काटेकोरपणे पाळले जात आहेत का, यावरही या घटनेच्या निमित्ताने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या प्रकरणाची पारदर्शक चौकशी होणे आवश्यक आहे, असे विवेक वेलणकर यांनी म्हटले

शेअर करा