सदाशिव पेठेतील वीज यंत्रणेला लागलेल्या आगीची चौकशी करा
सजग नागरिक मंचाची मागणी; २७ एप्रिलला सुमारे ४०० वीज ग्राहकांची तब्बल २५ तास वीजपुरवठा खंडित
1 મિનિટ વાંચન

सजग नागरिक मंचाची मागणी; २७ एप्रिलला सुमारे ४०० वीज ग्राहकांची तब्बल २५ तास वीजपुरवठा खंडित
या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी गेल्या वर्षभरात याच ठिकाणी लागलेली ही दुसरी आग असल्याने सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत
निलेश राऊत
पुणे: महावितरणच्या सदाशिव पेठेतील अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयाजवळील वीज यंत्रणेला २७ एप्रिल रोजी लागलेल्या आगीच्या घटनेची तातडीने सखोल तांत्रिक चौकशी करावी, अशी मागणी सजग नागरिक मंचाने केली आहे. या आगीत सुमारे ४०० वीज ग्राहकांना तब्बल २५ तास वीजपुरवठा खंडित झाल्याने अंधारात राहावे लागले होते.

या संदर्भात मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी पुणे विद्युत निरीक्षक यांना पत्र दिले आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी गेल्या वर्षभरात याच ठिकाणी लागलेली ही दुसरी आग असल्याने सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
ही आग नेमकी कशामुळे लागली, यामागे तांत्रिक बिघाड, देखभाल-दुरुस्तीतील त्रुटी, अपुरी व्हेंटिलेशन व्यवस्था किंवा संबंधित अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा कारणीभूत आहे का, याची सखोल पडताळणी करून अहवाल जाहीर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
महावितरणच्या वीज यंत्रणांमध्ये सुरक्षेचे मानदंड काटेकोरपणे पाळले जात आहेत का, यावरही या घटनेच्या निमित्ताने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या प्रकरणाची पारदर्शक चौकशी होणे आवश्यक आहे, असे विवेक वेलणकर यांनी म्हटले
