मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

दौंड तालुक्यात पतीने वायरने आवळला पत्नीचा गळा

घरात झोपलेल्या पत्नीवर अचानक हल्ला करत बेदम मारहाण

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

दौंड तालुक्यात पतीने वायरने आवळला पत्नीचा गळा

घरात झोपलेल्या पत्नीवर अचानक हल्ला करत बेदम मारहाण

पुणे: दौंड तालुक्यातील वरखंड येथे एका इसमाने आपल्या पत्नीचा गळा वायरने आवळून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घरात झोपलेल्या पत्नीवर पतीने अचानक हल्ला करत तिला बेदम मारहाणही केली. याप्रकरणी यवत पोलिसांनी पतीविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.

अर्चना इंद्रजित जगताप (वय २९, रा. मांजराई मळा, जगताप वस्ती, वरखंड, ता. दौंड) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पती इंद्रजित जगन्नाथ जगताप याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०९, ११८ (१), ११५ (२), ३५२ आणि ३५१ (२) (३) नुसार गुन्हा नोंदवला आहे.

बेडरुममध्ये थरार
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. २८) सायंकाळी पाचच्या सुमारास फिर्यादी अर्चना या सासरी बेडरुममध्ये झोपलेल्या होत्या. यावेळी आरोपी इंद्रजित याने अचानक खोलीत प्रवेश केला. त्याने तिथे असलेल्या टेबल फॅनची इलेक्ट्रिक वायर अर्चना यांच्या गळ्याला लपेटली. त्यानंतर पाठीला गुडघा लावून वायरच्या साहाय्याने गळा आवळून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

अमानुष मारहाण आणि जखमा
पतीने केवळ गळा आवळलाच नाही, तर अर्चना यांच्या ओठावर आणि उजव्या खांद्यावर जोरात चावा घेतला. तसेच त्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत शरीराच्या नाजूक भागावर लाथाबुक्क्यांनी गंभीर मारहाण केली. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाल्या आहेत. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. यवत पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गाडेकर या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

शेअर करा