मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Maharashtra Assembly Interim Budget Session 2024 : गेली ती शिवशाही, आली गुंडाशाही; विरोधकांकडून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी

•उपमुख्यमंत्री अजित पवार राज्याचे अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहे

V
Vivek

1 मिनिट वाचन

Maharashtra Assembly Interim Budget Session 2024 : गेली ती शिवशाही, आली गुंडाशाही; विरोधकांकडून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी

•उपमुख्यमंत्री अजित पवार राज्याचे अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहे

मुंबई :- राज्याचे अंतरिम अर्थसंकल्प अधिवेशन चालू आहे. आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार राज्याचे अंतरिम अर्थसंकल्प सादर करणारा आहे. तत्पूर्वी राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे सर्व आमदार विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत आहे. हातात प्रतीकात्मक बंदुकी घेऊन राज्याचे विरोधी पक्षनेते विधानपरिषद अंबादास दानवे यांनी "गेली ती शिवशाही, आली गुंडाशाही" सरकार विरोधात घोषणाबाजी करत आहे. Maharashtra Assembly Interim Budget Session 2024

मागील काही महिन्यात राजकीय गोळीबाराच्या घटना सातत्याने समोर येत आहे. त्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून विरोधकांना आणि अधिवेशनात आयते कोलीत भेटल्यामुळे विरोधकांनी या मुद्द्यावर सरकारला कोंडीस धरण्याचा प्रयत्न केला आहे. Maharashtra Assembly Interim Budget Session 2024

गेल्या काही महिन्यात महाराष्ट्र मध्ये झालेले गोळीबार
शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या घालून निर्घुण हत्या करण्यात आली. पुण्यात पत्रकार निखील वागळे यांच्यावर पोलिसांच्या उपस्थितीत प्राणघातक हल्ला करण्यात आला. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशनमध्ये दोन लोकांवर गोळीबार केला. 22 जानेवारी रोजी मीरा रोड येथे धार्मिक तणाव, सरकारने बुलडोझर चालवून गरिबांची घरे तोडली. जळगावातील भाजपचे नगरसेवक मोरे यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली. यवतमाळ शहरात भर दिवसा एका तरुणाची हत्या करण्यात आली. Maharashtra Assembly Interim Budget Session 2024

शेअर करा