Goa CM Pramod Sawant : गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर पुण्यात यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; प्रकृती स्थिर
Goa CM Health Update : मुख्यमंत्रीपदाच्या 7 व्या वर्धापनदिनीच प्रकृती खालावली; रुबी हॉल क्लिनिकमध्ये अँजिओप्लास्टी संपन्न
1 मिनिट वाचन

Goa CM Health Update : मुख्यमंत्रीपदाच्या 7 व्या वर्धापनदिनीच प्रकृती खालावली; रुबी हॉल क्लिनिकमध्ये अँजिओप्लास्टी संपन्न
पुणे :- गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत Goa CM Pramod Sawant Health यांना गुरुवारी (19 मार्च 2026) दुपारी अचानक छातीत त्रास जाणवू लागल्याने पुण्यातील प्रसिद्ध रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर तातडीने हृदयाची शस्त्रक्रिया (अँजिओप्लास्टी) करण्यात आली असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. Pune Latest News
मुख्यमंत्री सावंत यांना काल दुपारी अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले होते. तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने प्राथमिक तपासणी आणि अँजिओग्राफी केल्यानंतर त्यांच्या हृदयाच्या रक्तवाहिनीत एक 'ब्लॉक' आढळला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून विख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉ. समिन शर्मा यांनी तातडीने अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेतला आणि ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली.
रुग्णालय प्रशासनाकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, शस्त्रक्रियेनंतर डॉ. प्रमोद सावंत यांना सध्या अतिदक्षता विभागात (ICU) डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून, पुढील काही तासांत सविस्तर मेडिकल रिपोर्ट प्रसिद्ध केले जातील.
योगायोगाची बाब म्हणजे, काल 19 मार्च रोजीच डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाचा 7 वर्षांचा यशस्वी कार्यकाळ पूर्ण केला आहे. 19 मार्च 2019 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर त्यांनी पहिल्यांदा राज्याची धुरा सांभाळली होती. आपल्या कार्यकाळाच्या सातव्या वर्धापनदिनीच त्यांना या शारीरिक व्याधीचा सामना करावा लागल्याने गोव्यातील राजकीय वर्तुळातून आणि जनतेकडून त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली जात आहे.




