Pune News : गौरी-गणपतीसाठी तयार फराळाला वाढती मागणी
Pune News : पुणे : महाराष्ट्र मिरर – गौरी-गणपतीच्या सणाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने पुण्यातील बाजारपेठांमध्ये सणाची लगबग वाढली आहे.
1 मिनिट वाचन

Pune News : पुणे : महाराष्ट्र मिरर – गौरी-गणपतीच्या सणाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने पुण्यातील बाजारपेठांमध्ये सणाची लगबग वाढली आहे. सजावटीच्या साहित्याबरोबरच विविध प्रकारच्या तयार फराळाला मोठी मागणी निर्माण झाली असून, फराळाच्या दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी वाढताना दिसत आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
गणेशोत्सवात गौरीचे आगमन झाल्यानंतर घराघरांत फराळ करण्याची परंपरा आहे. मात्र, बदलती जीवनशैली आणि महिलांचा नोकरी-व्यवसायातील वाढता सहभाग यामुळे घरच्या घरी मोठ्या प्रमाणात फराळ तयार करण्यासाठी वेळ मिळत नसल्याचे चित्र आहे.
त्यातच मुलांचे शाळेचे वेळापत्रक, विविध क्लासेस, घरातील दैनंदिन कामे आणि इतर जबाबदाऱ्यांमुळे फराळ बनविण्यासाठी वेळ काढणे अनेक महिलांसाठी आव्हानात्मक ठरत आहे. त्यामुळे चकली, करंजी, लाडू, शंकरपाळे, शेव, चिवडा यांसह विविध प्रकारचा तयार फराळ खरेदी करण्याकडे महिलांचा कल वाढला आहे.https://maharashtramirror.com/ Pune news
तयार फराळाचे दर घरच्या फराळाच्या तुलनेत काहीसे जास्त असले, तरी वेळेची बचत आणि चवीतील सातत्य यामुळे ग्राहक तयार फराळाला पसंती देत आहेत. सणाच्या पार्श्वभूमीवर फराळ विक्रेत्यांनीही विविध प्रकारचे पॅकेज आणि ग्राहकांच्या आवडीनुसार फराळाचे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.https://maharashtramirror.com/ Pune news
गौरी-गणपतीच्या दिवसांत फराळाची मागणी आणखी वाढण्याची शक्यता असून, यंदाच्या सणासुदीत तयार फराळाची बाजारपेठ चांगलीच बहरण्याची अपेक्षा विक्रेत्यांकडून व्यक्त केली जात आहे.
“माझी आई प्रमिला रावखंडे गेल्या दहा वर्षांपासून गौरी-गणपती आणि दिवाळीसाठी विविध प्रकारचा घरगुती फराळ बनवते. सुरुवातीला शहरातील महिलांकडून फराळाची मागणी होती; मात्र आता ग्रामीण भागातूनही मोठ्या प्रमाणात ऑर्डर मिळतात. फराळ बनविण्यासाठी मोठी मेहनत आणि वेळ द्यावा लागतो. आम्ही चांगल्या दर्जाचा फराळ सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात विक्री करतो. त्यामुळे ग्राहकांचा विश्वास आणि मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.”
— आकांक्षा रावखंडे, महिला फराळ व्यावसायिक




