चाकणमध्ये गांजा विक्री करणारा अटकेत
सुमारे ७० हजारांचा मुद्देमाल जप्त
1 मिनिट वाचन

सुमारे ७० हजारांचा मुद्देमाल जप्त
पिंपरी: चाकण परिसरात अमली पदार्थांविरोधात कारवाई करत दक्षिण महाळुंगे पोलिसांनी गांजा विक्री करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून सुमारे ७० हजार रुपये किमतीचा गांजा आणि मोबाईल जप्त करण्यात आला. ही कारवाई २२ मे रोजी दुपारी तीनच्या सुमारास स्पायसर चौक ते व्होक्सवॅगन रोडलगत डोंगरवस्ती, निघोजे परिसरात करण्यात आली.
छायाचित्रे · 1/1
Arrow Keys ⟵ ⟶
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव संभाजी विठ्ठल मातरे (वय ३८, रा. डोंगरवस्ती, खेड, मूळ रा. बीड) असे आहे.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आरोपी गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. तपासणीदरम्यान त्याच्याकडून १ किलो १९६ ग्रॅम गांजा व एक मोबाईल फोन जप्त करण्यात आला. जप्त मुद्देमालाची किंमत ६९ हजार ८०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस शिपाई रणधीर माने यांनी फिर्याद दिली असून एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




