मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

चाकण येथील कंपनीतून आठ लाखांचे २३ लॅपटॉप चोरणारा गजाआड

संशयित कंपनीचा कर्मचारी आहे

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

चाकण येथील कंपनीतून आठ लाखांचे २३ लॅपटॉप चोरणारा गजाआड

संशयित कंपनीचा कर्मचारी आहे

पिंपरी: चाकण एमआयडीसीमधील 'टेट्रा पॅक इंडिया' या नामांकित कंपनीतून वेळोवेळी २३ लॅपटॉप चोरणार्‍या कंपनीच्याच
कर्मचार्‍यालाच पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही चोरी सप्टेंबर २०२४ ते जानेवारी २०२६ या काळात करण्यात आली होती.

संजय सुदाम गाडे (वय ५४, रा. खेड) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. स्वप्नील सुनील पाटील (वय ३३, रा. बाणेर) याला अटक केली आहे.

स्वप्नील हा कंपनीत कामगार म्हणून कार्यरत होता. त्याने आपल्या पदाचा गैरफायदा करून कंपनीच्या स्टोअरमधून ८ लाख ५ हजार रुपये किमतीचे 'एचपी' कंपनीचे २३ लॅपटॉप वेळोवेळी चोरून नेले होते. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या सहाय्याने स्वप्नील याला अटक केली.

शेअर करा