चाकण येथील कंपनीतून आठ लाखांचे २३ लॅपटॉप चोरणारा गजाआड
संशयित कंपनीचा कर्मचारी आहे
PG
Prashik Ghaste
1 min read

संशयित कंपनीचा कर्मचारी आहे
पिंपरी: चाकण एमआयडीसीमधील 'टेट्रा पॅक इंडिया' या नामांकित कंपनीतून वेळोवेळी २३ लॅपटॉप चोरणार्या कंपनीच्याच
कर्मचार्यालाच पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही चोरी सप्टेंबर २०२४ ते जानेवारी २०२६ या काळात करण्यात आली होती.

संजय सुदाम गाडे (वय ५४, रा. खेड) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. स्वप्नील सुनील पाटील (वय ३३, रा. बाणेर) याला अटक केली आहे.
स्वप्नील हा कंपनीत कामगार म्हणून कार्यरत होता. त्याने आपल्या पदाचा गैरफायदा करून कंपनीच्या स्टोअरमधून ८ लाख ५ हजार रुपये किमतीचे 'एचपी' कंपनीचे २३ लॅपटॉप वेळोवेळी चोरून नेले होते. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या सहाय्याने स्वप्नील याला अटक केली.


