मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : संघर्षातून उद्योजकतेकडे; समाजसेवेतून वेगळी ओळख निर्माण करणारे गणेश विटकर

Pune News : पुणे : जिद्द, सातत्य आणि नव्या संधींचा शोध घेत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे युवा उद्योजक गणेश रामदास विटकर हे व्यवसायासोबत सामाजिक क्षेत्रातही सक्रिय आहेत.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

संघर्षातून उद्योजकतेकडे; समाजसेवेतून वेगळी ओळख निर्माण करणारे गणेश विटकर
संघर्षातून उद्योजकतेकडे; समाजसेवेतून वेगळी ओळख निर्माण करणारे गणेश विटकर

Pune News : पुणे : जिद्द, सातत्य आणि नव्या संधींचा शोध घेत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे युवा उद्योजक गणेश रामदास विटकर हे व्यवसायासोबत सामाजिक क्षेत्रातही सक्रिय आहेत. इव्हेंट मॅनेजमेंट, डिजिटल मार्केटिंग आणि व्यवसाय प्रमोशनच्या माध्यमातून विविध उद्योजकांना व्यासपीठ देण्याचे काम ते करीत आहेत.https://maharashtramirror.com/ Pune News

आनंदी युनिव्हर्स फाउंडेशनच्या माध्यमातून शिक्षण, स्वावलंबन, समाजसेवा, महिला सक्षमीकरण आणि युवा उद्योजकतेला प्रोत्साहन देत समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींच्या कार्याची दखल घेत त्यांचा सन्मान केला जात आहे. विविध पुरस्कार सोहळ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सामाजिक, व्यावसायिक, शैक्षणिक आणि उद्योजकीय क्षेत्रातील व्यक्तींना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.

“पुरस्कार हा केवळ सन्मान नसून पुढील कामाची प्रेरणा आहे; आणि व्यवसाय म्हणजे केवळ स्वतःची प्रगती नव्हे, तर इतरांसाठीही संधी निर्माण करणे,” या विचारातून गणेश विटकर यांची वाटचाल सुरू आहे. युवा पिढीने स्वावलंबी होऊन स्वतःच्या कर्तृत्वातून रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात, हा संदेशही त्यांच्या उपक्रमातून दिला जात आहे. व्यवसायासोबत समाजासाठी काहीतरी सकारात्मक करण्याची त्यांची ही वाटचाल आगामी काळात अधिक व्यापक करण्याचा त्यांचा मानस आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा