मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

हडपसरमध्ये घसरगुंडी अंगावर पडून चार वर्षांच्या मुलीचा मृत्यू

सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाबद्दल गुन्हा दाखल

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

हडपसरमध्ये घसरगुंडी अंगावर पडून चार वर्षांच्या मुलीचा मृत्यू

सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाबद्दल गुन्हा दाखल

पुणे: हडपसरमधील मगरपट्टा परिसरात असलेल्या एका सोसायटीत खेळत असताना लोखंडी घसरगुंडी अंगावर पडल्याने चार वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. घसरगुंडी योग्य ठिकाणी व्यवस्थित न बसवता ती रस्त्याच्या कडेला निष्काळजीपणे ठेवल्याने हा अपघात झाला. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी सोसायटीचे चेअरमन आणि इतर कार्यकारी सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हडपसर येथील मगरपट्टा, नोबेल हॉस्पिटल शेजारी असलेल्या ‘वेदविहार’ सोसायटीत ही धक्कादायक घटना घडली. यासंदर्भात चिमुरडीच्या ३४ वर्षीय पित्याने फिर्याद दिली आहे. ७ एप्रिल २०२६ रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास फिर्यादी यांची चार वर्षांची मुलगी सोसायटीच्या मोकळ्या जागेत खेळत होती. या ठिकाणी असलेली एक जड लोखंडी घसरगुंडी सोसायटी प्रशासनाने रस्त्याच्या कडेला काढून ठेवली होती. ही घसरगुंडी जमिनीला किंवा योग्य ठिकाणी पक्की बसवण्यात आली नव्हती.

मुलगी खेळत असताना ही घसरगुंडी अचानक तिच्या अंगावर कोसळली. या भीषण अपघातात मुलीच्या तोंडाला, डोक्याला आणि मानेला गंभीर दुखापत झाली. ती जागीच बेशुद्ध पडली. तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर हडपसर पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र, तपासाअंती सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी दाखवलेला हलगर्जीपणा या मृत्यूला कारणीभूत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

हडपसर पोलिसांनी याप्रकरणी सोसायटीचे चेअरमन आणि कार्यकारी समितीच्या सदस्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०६ आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक विनोद साने या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. सोसायटीमधील खेळणी किंवा इतर साहित्याची देखभाल करताना सुरक्षेकडे दुर्लक्ष करणे कसे जीवावर बेतू शकते, याचे हे धक्कादायक उदाहरण समोर आले आहे.

Four-year-old girl dies after falling from a ladder in Hadapsar

शेअर करा