मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

लहान मुलीच्या मृत्यूप्रकरणी चार सदस्यांची समिती स्थापन

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात डोळ्यांच्या शस्त्रक्रियेदरम्यान ६ वर्षांच्या मुलीचा मृत्यू प्रकरण; समितीला सात दिवसांच्या आत प्राथमिक अहवाल सादर करण्याचे आदेश

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

लहान मुलीच्या मृत्यूप्रकरणी चार सदस्यांची समिती स्थापन

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात डोळ्यांच्या शस्त्रक्रियेदरम्यान ६ वर्षांच्या मुलीचा मृत्यू प्रकरण; समितीला सात दिवसांच्या आत प्राथमिक अहवाल सादर करण्याचे आदेश

निलेश राऊत
पुणे:
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात डोळ्यांच्या शस्त्रक्रियेदरम्यान सहा वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याप्रकरणी महापालिकेच्या आरोग्य विभागाने चार सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली आहे. त्यामध्ये महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रशांत बोठे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी डॉ. स्मिता सांगडे, डॉ. किरण म्हंकाले आणि डॉ. आरती कदम यांचा समावेश आहे. या समितीला सात दिवसांच्या आत प्राथमिक अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

छायाचित्रे · 1/1

Arrow Keys ⟵ ⟶

महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी या संदर्भात आदेश दिले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील सुपा येथील रहिवासी असलेली प्रियांशी बागडे (वय ६ वर्षे) हिला डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी दीनानाथ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या शस्त्रक्रियेदरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी रुग्णालय प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी केली होती.

रुग्णालय प्रशासनाला नोटीस बजावली
या प्रकरणाची दखल घेत महापालिका प्रशासनाने चौकशी सुरू करत रुग्णालय प्रशासनाला नोटीस बजावली होती. त्यानुसार रुग्णालय प्रशासनाला संबंधित प्रकरणाची सर्व वैद्यकीय कागदपत्रे, उपचारांचे रेकॉर्ड आणि शस्त्रक्रियेचा तपशील आरोग्य विभागाकडे त्वरित जमा करण्याचे आदेश देण्यात आले होते. चौकशी समितीमध्ये दोन बालरोगतज्ज्ञ आणि एका भूलतज्ज्ञाचा समावेश आहे.

शेअर करा