लहान मुलीच्या मृत्यूप्रकरणी चार सदस्यांची समिती स्थापन
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात डोळ्यांच्या शस्त्रक्रियेदरम्यान ६ वर्षांच्या मुलीचा मृत्यू प्रकरण; समितीला सात दिवसांच्या आत प्राथमिक अहवाल सादर करण्याचे आदेश
1 મિનિટ વાંચન

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात डोळ्यांच्या शस्त्रक्रियेदरम्यान ६ वर्षांच्या मुलीचा मृत्यू प्रकरण; समितीला सात दिवसांच्या आत प्राथमिक अहवाल सादर करण्याचे आदेश
निलेश राऊत
पुणे: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात डोळ्यांच्या शस्त्रक्रियेदरम्यान सहा वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याप्रकरणी महापालिकेच्या आरोग्य विभागाने चार सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली आहे. त्यामध्ये महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रशांत बोठे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी डॉ. स्मिता सांगडे, डॉ. किरण म्हंकाले आणि डॉ. आरती कदम यांचा समावेश आहे. या समितीला सात दिवसांच्या आत प्राथमिक अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
તસવીરો · 1/1
Arrow Keys ⟵ ⟶
महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी या संदर्भात आदेश दिले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील सुपा येथील रहिवासी असलेली प्रियांशी बागडे (वय ६ वर्षे) हिला डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी दीनानाथ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या शस्त्रक्रियेदरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी रुग्णालय प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी केली होती.
रुग्णालय प्रशासनाला नोटीस बजावली
या प्रकरणाची दखल घेत महापालिका प्रशासनाने चौकशी सुरू करत रुग्णालय प्रशासनाला नोटीस बजावली होती. त्यानुसार रुग्णालय प्रशासनाला संबंधित प्रकरणाची सर्व वैद्यकीय कागदपत्रे, उपचारांचे रेकॉर्ड आणि शस्त्रक्रियेचा तपशील आरोग्य विभागाकडे त्वरित जमा करण्याचे आदेश देण्यात आले होते. चौकशी समितीमध्ये दोन बालरोगतज्ज्ञ आणि एका भूलतज्ज्ञाचा समावेश आहे.
