मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pimpri Crime News : वाकडमध्ये फूड डिलिव्हरी बॉय एमडी ड्रग्ससह गजाआड

आरोपीकडून दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

M
mubarak

1 मिनिट वाचन

आरोपीकडून दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे, महाराष्ट्र मिरर : ऑनलाईन फूड डिलिव्हरीचे काम करणाऱ्या एका तरुणाला वाकड परिसरात दीड लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे एमडी (मॅफेड्रॉन) पावडर विकताना पोलिसांनी अटक केली आहे.

ही कारवाई गुरुवारी (१८ जून) रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास श्री साई इंग्लिश स्कूलच्या मागच्या मोकळ्या मैदानात करण्यात आली.

या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस फौजदार संदीप गवारी यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार निसार अकबर मुजावर (२६, रा. गुजरनगर, थेरगाव, मूळ रा. तुळजापूर, धाराशिव) या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी निसार मुजावर हा फूड डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. तो स्कूलच्या पाठीमागील मैदानामध्ये ३८ हजार रुपये किमतीचे ७.६० ग्रॅम वजनाचे पांढरट रंगाचे एमडी (मॅफेड्रॉन) पावडर विकण्यासाठी घेऊन आला होता. पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडले आणि त्याच्याकडून अंमली पदार्थांसह प्लॅस्टिक पिशव्या, एक मोबाईल आणि मोपेड दुचाकी असा एकूण १ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

वाकड पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

Food Delivery Boy Arrested

शेअर करा