मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Fir on Rajendra Shilimkar | माजी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांच्यासह ४ जणांवर जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

रुद्राभिषेक पूजेत जाण्यास रोखले

M
mubarak

1 मिनिट वाचन

fir on rajendra shilimkar

  • रुद्राभिषेक पूजेत जाण्यास रोखले
  • पुणे, दि. १४ ऑगस्ट, महाराष्ट्र मिरर : Fir on Rajendra Shilimkar

    सातारा रस्त्यावरील शंकरबाबा महाराज मठ येथे रुद्राभिषेक पूजेसाठी आलेल्या चेतन आरडे यांना रोखून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर Rajendra Shilimkar यांच्यासह ४ जणांवर जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी अट्रॉसिटीचा (Scheduled Caste and Scheduled Tribe (Prevention of Atrocities) Act, 1989) गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. सहकारनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Sahkarnagar Police Station

    याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी चेतन प्रभाकर आरडे हे दि. २० जून रोजी सातारा रस्त्यावरील शंकरबाबा महाराज मठ येथे माजी नगरसेवक महेश वाबळे यांच्या समवेत दर्शनासाठी गेले असता तेथे रुद्राभिषेक पूजा चालू होती. यावेळी फिर्यादी आरडे यांनी पूजेच्या खोलीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला असता माजी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर व इतर यांनी जातीवाचक शिवीगाळ केली तसेच मारहाण केली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

    फिर्यादी चेतन प्रभाकर आरडे यांनी तक्रार दिल्यावरून सहकारनगर पोलीस ठाण्यात गुरन. २६८/२०२४ भादंवि कलम ३२३, ५०४, ५०६, ३४, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम Atrocities Act,, १९८९ ३(१) (r), ३(१) (s), ३(१) (y), अन्वये राजेंद्र यशवंत शिळीमकर, महेश यशवंत शिळीमकर तसेच दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

    हेही वाचा: Pune Crime News : तम्मा कुसाळकर टोळीचा सदस्य पोलिसांच्या ताब्यात, प्राणघातक हल्ला प्रकरणातील फरार आरोपीला शिवाजीनगर पोलिसांनी केली अटक

    हेही वाचा: Pune Spa Racket | पुण्यात 'प्रिया'चे 'स्पा'च्या नावाखाली मोठे रॅकेट !

    शेअर करा