मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : मसाल्यांतील भेसळीवर FDA चा कडक वॉच; नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईचा बडगा

Pune News : पुणे : महाराष्ट्रात मसाल्यांमधील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (FDA) अधिक सतर्क झाले असून, मसाल्यांची गुणवत्ता, स्वच्छता आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन करण्यावर भर दिला जात आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

मसाल्यांतील भेसळीवर FDA चा कडक वॉच; नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईचा बडगा
मसाल्यांतील भेसळीवर FDA चा कडक वॉच; नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईचा बडगा

Pune News : पुणे : महाराष्ट्रात मसाल्यांमधील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (FDA) अधिक सतर्क झाले असून, मसाल्यांची गुणवत्ता, स्वच्छता आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन करण्यावर भर दिला जात आहे. तुकाराम मुंढे यांच्या भूमिकेमुळे हा विषय पुन्हा चर्चेत आला असून, भेसळयुक्त मसाल्यांविरोधात तपासणी आणि कारवाईला महत्त्व प्राप्त झाले आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

हळद, तिखट, धणे, जिरे, काळी मिरी, दालचिनी, लवंग, वेलदोडे, केशर, खसखस यांसह गरम मसाला आणि करी पावडर यांसारख्या उत्पादनांच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष दिले जाणार आहे. ग्राहकांना सुरक्षित आणि दर्जेदार मसाले मिळावेत, यासाठी अन्नसुरक्षा मानकांचे पालन करणे आवश्यक आहेhttps://maharashtramirror.com/ Pune news

मसाल्यांना आकर्षक रंग देण्यासाठी घातक रंगांचा वापर निषिद्ध
मसाल्यांना अधिक आकर्षक रंग देण्यासाठी किंवा त्यांची गुणवत्ता चांगली असल्याचा भास निर्माण करण्यासाठी आरोग्यास घातक रंगांचा वापर करणे प्रतिबंधित आहे. मेटॅनिक यलो, रोडामाइन बी, सुदान डाईज आणि लेड क्रोमेट यांसारख्या अनधिकृत रंगांची भेसळ आढळल्यास संबंधित उत्पादक, विक्रेते किंवा जबाबदार व्यक्तींवर नियमानुसार कायदेशीर कारवाई होऊ शकते.

या पार्श्वभूमीवर मसाल्यांचे नमुने गोळा करून त्यांची प्रयोगशाळेत तपासणी करणे, तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणे महत्त्वाचे ठरणार आहे.

वजन वाढवण्यासाठी भेसळ केल्यास कारवाई
मसाल्यांचे वजन किंवा प्रमाण वाढवण्यासाठी विटांची भुकटी, खडू, लाकडाचा भुसा, परकीय स्टार्च किंवा अन्य अनधिकृत पदार्थ मिसळणे नियमबाह्य आहे. तसेच निकृष्ट दर्जाचे मसाले चांगल्या दर्जाच्या मसाल्यांमध्ये मिसळणे आणि अर्क काढून घेतलेल्या मसाल्यांची योग्य माहिती न देता विक्री करणे यांसारख्या प्रकारांवरही कारवाई होऊ शकते.

ग्राहकांनीही घ्यावी काळजी
मसाले खरेदी करताना ग्राहकांनी पॅकबंद उत्पादनांवरील लेबल, उत्पादकाची माहिती, बॅच क्रमांक, उत्पादनाची वैधता आणि FSSAI परवाना क्रमांक तपासावा. संशयास्पद रंग, वास किंवा गुणवत्तेचे मसाले आढळल्यास संबंधित अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी.

मसाल्यांमधील भेसळ रोखणे, अन्नसुरक्षेचे निकष पाळणे आणि ग्राहकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे, ही अन्न व औषध प्रशासनासह संपूर्ण अन्नपुरवठा साखळीची जबाबदारी आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेअर करा