मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

दौंडमध्ये बापाने केला नऊ वर्षांच्या मुलीचा खून

गुणपत्रिकेवर खाडाखोड केल्याच्या रागातून पित्याचे क्रूर कृत्य

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

दौंडमध्ये बापाने केला नऊ वर्षांच्या मुलीचा खून

गुणपत्रिकेवर खाडाखोड केल्याच्या रागातून पित्याचे क्रूर कृत्य

पुणे: दौंड तालुक्यातील देउळगाव राजे येथे माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या मुलाच्या शाळेच्या गुणपत्रिकेवर (निकालपत्रक) खाडाखोड केल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका संतापलेल्या पित्याने स्वतःच्या नऊ वर्षांच्या मुलीचा लाकूड कापण्याच्या मशीनने वार करून निर्घृण खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी नराधम पित्याने मुलीचा मृतदेह कपड्यात गुंडाळून घर पेटवून दिले. याप्रकरणी दौंड पोलिसांनी मुख्य आरोपीसह एका महिलेला अटक केली आहे.

अनामिका शांताराम चव्हाण (वय ९) असे या घटनेत मृत्यू झालेल्या दुर्दैवी बालिकेचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी शांताराम दुर्याधन चव्हाण आणि चिंगु शिंदबाद भोसले (दोघे रा. हनुमान वस्ती, देउळगाव राजे, ता. दौंड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शांताराम याचा मुलगा संस्कार याच्या शाळेच्या गुणपत्रिकेवर अनामिकाने काही तरी खाडाखोड केली होती. याचा राग शांतारामच्या मनात होता. रविवारी (ता. ३) पहाटे सव्वा तीनच्या सुमारास घरात सर्वजण झोपलेले असताना शांतारामने अनामिकाला गाठले. संतापाच्या भरात त्याने लाकूड कापण्याचे इलेक्ट्रिक मशीन सुरू करून बालिकेचा खून केला.

मुलीची हत्या केल्यानंतर शांतारामने तिचा मृतदेह कपड्यांमध्ये गुंडाळला आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने स्वतःचे घर पेटवून दिले. यामध्ये मुलीचा मृतदेह अर्धवट जळाला. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या चिंगु भोसले या महिलेने ही घटना कोणालाही न सांगण्याचे बजावत पोलिसांपासून माहिती लपवून ठेवली. मात्र, पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे या क्रूर हत्याकांडाचा छडा लावला.

दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार निलेश आत्माराम फडणीस यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०३(१), २३८ आणि ३(५) नुसार हत्येचा आणि पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक सुनील उगले या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

शेअर करा