Pune News : फार्मर आयडीच्या आधारे स्वतंत्र शेतकरी ओळखपत्र तयार करण्यास मनाई
Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : अॅग्रीस्टॅक योजनेंतर्गत प्राप्त फार्मर आयडीच्या आधारे स्वतंत्र शेतकरी ओळखपत्र तयार करणे व त्याचे वितरण करणे अनधिकृत असल्याचे केंद्र शासनाने स्पष्ट केले आहे.
1 मिनिट वाचन

Pune News : अनधिकृत ओळखपत्रांची निर्मिती व वितरण थांबविण्याचे कृषी विभागाचे आवाहन
Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : अॅग्रीस्टॅक योजनेंतर्गत प्राप्त फार्मर आयडीच्या आधारे स्वतंत्र शेतकरी ओळखपत्र तयार करणे व त्याचे वितरण करणे अनधिकृत असल्याचे केंद्र शासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्यातील सर्व कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) चालकांनी अशा प्रकारची कार्यवाही तत्काळ थांबवावी, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
काही जिल्ह्यांमध्ये फार्मर आयडीच्या आधारे स्वतंत्र ओळखपत्रे तयार करून वितरित केली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. शेतकऱ्यांनीही अशा अनधिकृत सेवांचा लाभ घेऊ नये व तयार करण्यात आलेल्या ओळखपत्रांना अधिकृत मान्यता असल्याचे समजू नये. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे सर्व संबंधितांनी काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनही कृषी विभागाने केले आहे.




