Pune News : इथेनॉलवरील संभाव्य निर्बंधाने साखर कारखान्यांचे आर्थिक गणित बिघडण्याची चिंता
Pune News :पुणे, मिरर : गतहंगामात राज्यातील साखर कारखान्यांना इथेनॉल विक्रीतून तब्बल ५ हजार ६३८ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले.
1 मिनिट वाचन

Pune News : गतहंगामात ५,६३८ कोटींचे उत्पन्न; एफआरपी आणि कर्जफेडीचा ताण वाढण्याची शक्यता
Pune News :पुणे, मिरर : गतहंगामात राज्यातील साखर कारखान्यांना इथेनॉल विक्रीतून तब्बल ५ हजार ६३८ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. मात्र, यंदा इथेनॉल निर्मितीसाठी उसाचा रस, सिरप आणि बी-हेवी मोलॅसिस वळविण्यावर केंद्र सरकारकडून संभाव्य निर्बंध आणण्याच्या चर्चेमुळे साखर कारखान्यांच्या आर्थिक गणिताची चिंता वाढली आहे. इथेनॉलमधील उत्पन्न घटल्यास प्रकल्पांच्या कर्जफेडीसह शेतकऱ्यांची एफआरपी वेळेत देण्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
केंद्र सरकारच्या पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाच्या धोरणामुळे साखर कारखान्यांना अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत मिळाला आहे. उसाचा रस, सिरप आणि बी-हेवी मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मिती केल्याने कारखान्यांना रोख उत्पन्न मिळते. त्यातून एफआरपी देण्यासही मदत होते.https://maharashtramirror.com/ Pune News
मात्र, महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील कमी पावसामुळे घटलेले ऊसक्षेत्र, साखरेचा कमी उतारा तसेच उत्तर प्रदेशातील रेड रॉट रोगाचा प्रादुर्भाव यामुळे यंदा साखर उत्पादन घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपलब्ध ऊस प्रामुख्याने साखर उत्पादनासाठी वापरला जावा, यासाठी इथेनॉल निर्मितीसाठी ऊस वळविण्यावर निर्बंध आणण्याचा विचार सुरू आहे.
इथेनॉलवर मर्यादा आल्यास प्रकल्पांमध्ये केलेल्या मोठ्या गुंतवणुकीवरील कर्जाचे हप्ते आणि व्याज फेडण्याचा ताण वाढू शकतो. त्यातच ऊसतोडीनंतर १४ दिवसांत एफआरपी देणे बंधनकारक असल्याने कारखान्यांच्या रोख प्रवाहावर अतिरिक्त दबाव येण्याची शक्यता आहे.
सहकारी कारखान्यांसाठी राज्य सरकारने एफआरपी थकबाकी आणि आगामी हंगामासाठी सॉफ्ट लोन योजना लागू केली आहे. मात्र, राज्यातील सुमारे १०६ खासगी कारखान्यांसाठी अद्याप अशा मदतीची घोषणा झालेली नाही.
साखर उत्पादनाला प्राधान्य देताना इथेनॉल प्रकल्पांवरील गुंतवणूक, कर्जफेड आणि एफआरपीचे आर्थिक गणितही विचारात घ्यावे, अशी मागणी साखर उद्योगातून होत आहे.




