मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Election News : विश्वासहार्य मतदार यादीसाठी नागरिकांनी एसआयआर मोहिमेत सहभागी व्हावे

पुणे, महाराष्ट्र मिरर Election News : एसआयआर (SIR) मोहिमेला अधिक गती देण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्यासह राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी कोथरुड मधील घराघरांत भेटी देत मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधला.

VZ
vidula zagade

1 मिनिट वाचन

Election News : विश्वासहार्य मतदार यादीसाठी नागरिकांनी एसआयआर मोहिमेत सहभागी व्हावे

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बीएलओंसह साधला कोथरूडकरांशी संवाद

पुणे, महाराष्ट्र मिरर Election News : एसआयआर (SIR) मोहिमेला अधिक गती देण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्यासह राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी कोथरुड मधील घराघरांत भेटी देत मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधला. यावेळी नागरिकांकडून भरलेले एसआयआर गणना फॉर्म स्वीकारून मोहिमेबाबत जनजागृतीही करण्यात आली.Election News

या भेटीदरम्यान मंत्री पाटील यांनी मतदारांना एसआयआर मोहिमेचे महत्त्व समजावून सांगत; प्रत्येक मतदाराची माहिती अचूक आणि अद्ययावत राहणे ही लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब असल्याचे सांगितले. मतदार यादी अधिक पारदर्शक, अचूक आणि विश्वासार्ह करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.Election News

विशेष म्हणजे यावेळी त्यांनी नागरिकांच्या शंकांचे निरसन करत; ज्यांनी अद्याप फॉर्म भरले नव्हते, अशा सर्वांना आवश्यक मार्गदर्शन करुन फॅार्म भरुन घेतले. तसेच, भरलेले फॉर्म तत्काळ स्वीकारून संबंधित अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्याची प्रक्रिया देखील यावेळी पार पडली.

“मतदार यादीतील अचूकता ही सशक्त लोकशाहीचा पाया आहे. प्रत्येक मतदाराचे नाव यादीत समाविष्ट असावे, कोणीही मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये, यासाठी निवडणूक आयोगाकडूनही या मोहिमेला ८ ॲागस्टपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे प्रत्येक मतदाराने एसआयआर मोहिमेत सहभागी होऊन आपला एसआयआर फॉर्म वेळेत भरून बीएलओंकडे जमा करावा,” असे आवाहनही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केले.

शेअर करा