मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai News : एकनाथ शिंदेंचा आंतरराष्ट्रीय सन्मान; ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी गौरव

Mumbai News : मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेण्यात आली आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

एकनाथ शिंदेंचा आंतरराष्ट्रीय सन्मान; ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी गौरव
एकनाथ शिंदेंचा आंतरराष्ट्रीय सन्मान; ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी गौरव

Mumbai News : लंडनमध्ये होणार विशेष सत्कार; ‘लाडकी बहीण’, ‘शासन आपल्या दारी’ आणि युवा कार्य प्रशिक्षण योजनेची दखल

Mumbai News : मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेण्यात आली आहे. ब्रिटनच्या संसदेत ९ आणि १० सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये शिंदे यांना तीन पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदे मंगळवारी लंडनला रवाना झाले आहेत.https://maharashtramirror.com/ Mumbai news
मुख्यमंत्री आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी राबवलेल्या नागरिक-केंद्री, पारदर्शक आणि नाविन्यपूर्ण प्रशासन पद्धतीची दखल घेत हा सन्मान दिला जाणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे. त्यांच्या कार्यकाळातील तीन प्रमुख कल्याणकारी योजनांची या पुरस्कारांसाठी विशेष दखल घेण्यात आली आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai News
यामध्ये महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठीची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’, नागरिकांना शासकीय सेवा थेट त्यांच्या घरापर्यंत पोहोचवणारा ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम आणि तरुणांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव देत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ यांचा समावेश आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai news

तीन पुरस्कारांनी होणार गौरव


ब्रिटिश संसदेच्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये एकनाथ शिंदे यांना ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच हाऊस ऑफ कॉमन्समध्ये आयोजित ‘इंटरनॅशनल कॉन्क्लेव्ह २०२६’मध्ये त्यांना ‘स्टेट्समनशिप अवॉर्ड’ प्रदान केला जाणार आहे. याशिवाय महाराष्ट्र मंडळातर्फे ‘ग्लोबल प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारानेही त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
यूके एशियन बिझनेस कौन्सिल आणि ‘कॅनव्हास फॉर केअर क्रिएटिव्ह आर्ट कॅम्पस’ यांच्या संयुक्त विद्यमाने ९ सप्टेंबर रोजी हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’ सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी उत्तर आयर्लंडच्या माजी फर्स्ट मिनिस्टर बॅरोनेस आर्लेन फॉस्टर आणि यूके एशियन बिझनेस कौन्सिलचे चेअरमन अँड्र्यू ग्रोकॉक यांच्या वतीने कौन्सिलचे उपाध्यक्ष सुदीप सकाळे यांनी शिंदे यांना निमंत्रण दिले आहे.

शेअर करा