मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai News : ईडीची सात राज्यांमध्ये मोठी कारवाई

Mumbai News : मुंबई - अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी (दि.२) बनावट टोल वसुली आणि सरकारी खात्यांमधून निधीच्या कथित गैरव्यवहाराप्रकरणी मोठी कारवाई केली.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

ईडीची सात राज्यांमध्ये मोठी कारवाई चौदा ठिकाणी एकाच वेळी शोधमोहीम सुरू
ईडीची सात राज्यांमध्ये मोठी कारवाई चौदा ठिकाणी एकाच वेळी शोधमोहीम सुरू

Mumbai News : चौदा ठिकाणी एकाच वेळी शोधमोहीम सुरू


Mumbai News : मुंबई - अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी (दि.२) बनावट टोल वसुली आणि सरकारी खात्यांमधून निधीच्या कथित गैरव्यवहाराप्रकरणी मोठी कारवाई केली. ईडीच्या लखनौ विभागीय कार्यालयाच्या एका पथकाने पीएमएलए (PMLA) अंतर्गत चौदा ठिकाणी एकाच वेळी शोधमोहीम सुरू केली https://maharashtramirror.com/wp-admin/post.php?post=51978&action=edit Mumbai News


सात राज्यांमध्ये छापे:
ईडीची ही कारवाई उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, जम्मू, मध्य प्रदेश, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनसीआर) आणि कोलकाता येथे सुरू आहे. तपासात असे उघड झाले आहे की, एनएचएआयच्या (NHAI) विविध टोल प्लाझांवर अनधिकृत सॉफ्टवेअरचा वापर केला जात होता.
“या सॉफ्टवेअरचा वापर खऱ्या टोल पावत्यांऐवजी बनावट किंवा अनधिकृत पावत्या तयार करण्यासाठी केला जात होता आणि टोलच्या रकमेचा काही भाग सरकारी खात्यांमध्ये नोंद होण्यापूर्वीच वळवला जात होता” असा आरोप करण्यात आला आहे. https://maharashtramirror.com/ Mumbai News
ईडीच्या म्हणण्यानुसार, फॉरेन्सिक तपास आणि एनएचएआयच्या नोंदींमधून अशा सॉफ्टवेअरच्या वापराची पुष्टी झाली आहे. या आधारावर, पुढील तपासासाठी ईडीने विविध ठिकाणी छापे टाकले आहेत. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, डिजिटल आणि कागदोपत्री पुरावे हस्तगत करणे, या फसवणुकीतून फायदा झालेल्यांना ओळखणे आणि गुन्ह्यातून मिळालेल्या पैशांचा माग काढणे, हे या छाप्यांचे उद्दिष्ट आहे. https://maharashtramirror.com/ Mumbai News
गेल्या महिन्यात, ईडीने अनेक टोल प्लाझांवरील फसव्या टोल वसुलीच्या संदर्भात, मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा, २००२ च्या कलम १७ अंतर्गत १४ ठिकाणी छापे टाकले. हे छापे उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, जम्मू, मध्य प्रदेश, राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एनसीआर) आणि कोलकाता येथील परिसरांमध्ये टाकण्यात आले.

शेअर करा