मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : सीबीएसई राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत उंड्रीच्या ध्रुव ग्लोबल स्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

Pune News :पुणे : तेलंगणा राज्यातील नचाराम येथे आयोजित 'सीबीएसई राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा २०२६' मध्ये ध्रुव ग्लोबल स्कूल (उंड्री) येथील युवा नेमबाजांनी अप्रतिम कामगिरी करत तीन सुवर्ण आणि एका कांस्यपदकावर आपले नाव कोरले.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

सीबीएसई राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत उंड्रीच्या ध्रुव ग्लोबल स्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश
सीबीएसई राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत उंड्रीच्या ध्रुव ग्लोबल स्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

Pune News :तीन सुवर्ण आणि एका कांस्यपदकाची कमाई; कार्तिकी पाटीलची 'एसजीएफआय' राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

Pune News :पुणे : तेलंगणा राज्यातील नचाराम येथे आयोजित 'सीबीएसई राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा २०२६' मध्ये ध्रुव ग्लोबल स्कूल (उंड्री) येथील युवा नेमबाजांनी अप्रतिम कामगिरी करत तीन सुवर्ण आणि एका कांस्यपदकावर आपले नाव कोरले. या दिमाखदार यशासह कार्तिकी पाटील हिची आगामी 'एसजीएफआय' शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

या राष्ट्रीय स्पर्धेत ध्रुव ग्लोबल स्कूलच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवले. वैयक्तिक प्रकारात कार्तिकी पाटील हिने उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन करत कांस्यपदक पटकावले, तर ईवा मोदी हिने राष्ट्रीय स्तरावर सहावा क्रमांक मिळवत छाप पाडली. सांघिक प्रकारात कार्तिकी पाटील, ईवा मोदी आणि ऋत्वी घनावत या तिघांच्या संघाने चमकदार कामगिरी करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. खेळाडूंची मेहनत, सातत्यपूर्ण सराव, जिद्द आणि प्रशिक्षक उज्ज्वला मॅडम यांचे उत्तम मार्गदर्शन यामुळेच हे यश शक्य झाल्याचे सांगण्यात आले.https://maharashtramirror.com/ Pune News

या उल्लेखनीय यशाबद्दल ध्रुव ग्लोबल स्कूलचे चेअरमन डॉ. संजय मालपाणी, संचालक यशोवर्धन मालपाणी आणि अनिष्का मालपाणी तसेच शाळेच्या प्राचार्या शारदा राव यांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी उज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या. या यशामुळे ध्रुव ग्लोबल स्कूलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर मिळवलेले हे यश अत्यंत अभिमानास्पद आहे. खेळाडूंची मेहनत आणि मार्गदर्शकांचे सहकार्य यातूनच हे यश साकार झाले आहे. - शारदा राव, प्राचार्या

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेअर करा