Dhayari Water Issue : धायरीकरांना मिळणार लवकरच हक्काचे पाणी,
पुणे, महाराष्ट्र मिरर
2 मिनिट वाचन

Dhayari Water Issue : काकासाहेब चव्हाण यांच्या पाठपुराव्यानंतर अधिकाऱ्यांना तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश
पुणे, महाराष्ट्र मिरर
Dhayari water issue : धायरीसह समाविष्ट गावांतील पाणीपुरवठ्याचा गंभीर प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर आणि मुख्य अभियंता (पाणीपुरवठा) नंदकिशोर जगताप यांनी गुरुवारी धायरी परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे पुणे महापालिकेतील गटनेते तथा नगरसेवक काकासाहेब चव्हाण यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर ही पाहणी करण्यात आली. Dhayari water issue pune pmc inspection
Moshi Tragedy : मृतांच्या वारसांना आर्थिक मदत मिळण्यास प्रारंभ
धायरी व प्रभाग क्रमांक ३३ मधील नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात गढूळ व दूषित पाण्याचा तसेच अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागत असल्याची समस्या कायम आहे. पाणीपुरवठ्याच्या स्रोतांमध्ये पावसाचे व गढूळ पाणी मिसळत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण होत असल्याचे सांगत काकासाहेब चव्हाण यांनी महापालिकेकडे वारंवार पाठपुरावा केला होता. तसेच हा मुद्दा महापालिकेच्या सभागृहातही उपस्थित करण्यात आला होता.

पाहणीदरम्यान अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी बारंगणी मळा येथील विहीर, परिसरातील पाणीपुरवठा टाक्या आणि संपूर्ण पाणीपुरवठा यंत्रणेची पाहणी केली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने तांत्रिक तपासणी करून आवश्यक उपाययोजना हाती घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. Dhayari water issue
यावेळी काकासाहेब चव्हाण यांनी धायरी परिसरातील नागरिकांना वर्षभर शुद्ध आणि नियमित पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी विविध पर्यायी उपाययोजना प्रशासनासमोर मांडल्या. समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत व्यंकटेश सेरेनिटी येथे उभारण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीची दुरवस्था निदर्शनास आणून देत तिची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणीही त्यांनी केली.
PMC Fraud : महापालिकेत ‘टॅक्स’ कपातीचे आमिष दाखवून ६ लाखांचा गंडा
धायरी परिसराचा झपाट्याने वाढणारा विस्तार लक्षात घेता भविष्यातील पाणीगरज भागविण्यासाठी नवीन जलसाठा व्यवस्था उभारणे, पाणी साठवण क्षमता वाढविणे, पाणीपुरवठा यंत्रणा सक्षम करणे आणि क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून दीर्घकालीन नियोजन करण्याची गरज असल्याचेही चव्हाण यांनी यावेळी अधोरेखित केले. Dhayari water issue

Moshi Tragedy : कचरा प्रकल्पांच्या टेंडरवरून महापालिकेत घमासान
यावर अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सर्व बाबींची सविस्तर तपासणी करून नागरिकांना शुद्ध व नियमित पाणीपुरवठा उपलब्ध होण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. तसेच दीर्घकालीन उपाययोजनांबाबतही सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
या पाहणीवेळी नगरसेविका अनिता इंगळे, नगरसेविका धनश्री कोल्हे, नगरसेवक सुभाष नाणेकर, संदीप चव्हाण, दशरथ मणेरे, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.

View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)




