मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस सरकारची मोठी घोषणा, EOW ची SIT करणार मुंबई मिठी नदी सफाई घोटाळ्याची चौकशी

Devendra Fadnavis On mithi River Scam : मुंबईतील मिठी नदीच्या साफसफाई काढण्याच्या कामात आणि किचड घोटाळा झाल्याची घटना समोर आली आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस सरकारची मोठी घोषणा, EOW ची SIT करणार मुंबई मिठी नदी सफाई घोटाळ्याची चौकशी

Devendra Fadnavis On mithi River Scam : मुंबईतील मिठी नदीच्या साफसफाई काढण्याच्या कामात आणि किचड घोटाळा झाल्याची घटना समोर आली आहे. भाजप नेत्यांच्या मागणीवरून राज्य सरकारने या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचा निर्णय घेतला.

मुंबई :- देशाची आर्थिक राजधानी मुंबई भ्रष्टाचारामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. भ्रष्टाचाराचे हे प्रकरण मुंबईतील मिठी नदीच्या Mithi River Scam स्वच्छतेच्या नावाखाली झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याशी संबंधित आहे. मुंबईतील गाळ घोटाळ्याच्या चौकशीची मागणी भाजप नेते सातत्याने करत होते.या प्रकरणाला गती आल्याचे पाहून राज्य सरकारने या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी आर्थिक गुन्हे शाखेच्या एसआयटीकडे Mumbai Crime Branch SIT सोपवली आहे.

वास्तविक, मुंबई शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या मिठी नदीच्या स्वच्छतेच्या आणि त्यातून गाळ उचलण्याच्या कंत्राटाच्या नावाखाली हा घोटाळा झाला आहे. मिठी नदीतील गाळ काढण्यात आणि खोलीकरणात अनियमितता झाल्याचा आरोप भाजपने केल्यानंतर आता या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून केली जाणार आहे.

मिठी नदीतील गाळ उचलण्यासाठी दिलेल्या कंत्राटात अनियमितता झाल्याचा आरोप महाराष्ट्र विधान परिषदेतील भाजप नेते प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी केला होता. या आरोपानंतर राज्य सरकारने एसआयटी स्थापन करून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते.

शेअर करा