CRRIME NEWS : बालेवाडीत ज्येष्ठ महिलेच्या घरातून १.९५ लाखांचा ऐवज लंपास
रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना
1 मिनिट वाचन

रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना
पुणे CRIMES NEWS: बालेवाडी परिसरात घरफोडीची घटना उघडकीस आली असून अज्ञात चोरट्याने ज्येष्ठ महिलेच्या घरातून रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ९५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना समोर आली आहे.

याप्रकरणी ६५ वर्षीय महिलेने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून भारतीय न्याय संहिता कलम ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.CRIMES NEWS
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २८ मे २०२६ ते ४ जून २०२६ रोजी सकाळी १०.३० च्या आसपास गोल्डन स्ट्रीट, बालेवाडी येथील निव अपार्टमेंटच्या फ्लॅट क्रमांक ३०२ मध्ये घडली. फिर्यादींचा फ्लॅट उघडा असताना अज्ञात चोरट्याने मुख्य दरवाजातून घरात प्रवेश करून कपाटातील ३५ हजार रुपये रोख रक्कम तसेच सोन्या-हिऱ्याचे दागिने असा एकूण १.९५ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्वाती लामखडे करीत आहेत. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.CRIMES NEWS
CRIMES NEWS




