CRIME NEWS : शिवाजीनगरमध्ये वेश्याव्यवसायातून दोन परराज्यातील व एका विदेशी महिलेची सुटका
गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे दोन हॉटेलांवर कारवाई; दोन एजंटांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा
2 मिनिट वाचन

गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे दोन हॉटेलांवर कारवाई; दोन एजंटांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा
पुणे CRIME NEWS: पुणे शहर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाने शिवाजीनगर परिसरातील दोन हॉटेलांवर छापा टाकून वेश्याव्यवसायात अडकविण्यात आलेल्या दोन परराज्यातील महिला आणि एका विदेशी महिलेची सुटका केली. या प्रकरणी दोन एजंटांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.CRIME NEWS

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १६ जून २०२६ रोजी अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा, पुणे शहर यांना शिवाजीनगर येथील आकाशवाणीसमोरील ‘द सेनच्युरिन हॉटेल’ येथे महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलीस निरीक्षक छगन कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने बनावट ग्राहकाच्या माध्यमातून पडताळणी केली. माहिती खरी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पथकाने हॉटेलवर अचानक छापा टाकला.CRIME NEWS
तीन महिलांची सुटका
या कारवाईत हॉटेलमध्ये वेश्याव्यवसायासाठी आणण्यात आलेल्या एका परराज्यातील पीडित महिलेची सुटका करण्यात आली. सुटका केलेल्या महिलेची चौकशी केली असता, संबंधित एजंटांनी आणखी दोन महिलांना ट्रीबो सहारा हॉटेल, सेनापती बापट रोड, पुणे येथे वेश्याव्यवसायासाठी ठेवले असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने तातडीने त्या ठिकाणी कारवाई करून आणखी दोन महिलांना ताब्यात घेतले. यामध्ये एक महिला परराज्यातील असून दुसरी महिला विदेशी नागरिक असल्याचे निष्पन्न झाले.CRIME NEWS
या प्रकरणी दोन एजंटांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १४३(१), १४३(३), ३(५) तसेच अनैतिक मानवी वाहतूक (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ मधील कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी महिलांना पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-४) विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक छगन कापसे, सहाय्यक पोलीस फौजदार आंधळे, पोलीस हवालदार भिवरकर, रसाळ, कोंडे, जाधव, महिला पोलीस हवालदार खेडेकर, इंगळे आणि कंक तसेच गुन्हे शाखेच्या पथकातील अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.CRIME NEWS
चौकट
सुटका झालेल्या महिलांची ओळख गुप्त
कायद्यानुसार अनैतिक मानवी वाहतूक व वेश्याव्यवसायाशी संबंधित गुन्ह्यांतील पीडित महिलांची ओळख जाहीर करता येत नसल्याने सुटका करण्यात आलेल्या महिला तसेच विदेशी महिलेची नावे पोलिसांनी गोपनीय ठेवली आहेत. या महिलांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक ती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
CRIME NEWS




