CRIME NEWS : तीन दरोडेखोर गजाआड; पंचवीस लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
2 मिनिट वाचन

पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
पुणे, महाराष्ट्र मिरर, CRIME NEWS: एका रात्रीत पाच ठिकाणी सशस्त्र दरोडे टाकणाऱ्या आंतरजिल्हा दरोडेखोरांच्या टोळीचा पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. त्यांच्याकडून सुमारे १७ तोळे सोन्याचे दागिने, ३२४ ग्रॅम चांदीचे दागिने आणि इतर मुद्देमालासह एकूण २५ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत तीन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून, एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. तर इतर फरार आरोपींचा शोध सुरु आहे.CRIME NEWS

गणेश मंगेश काळे (वय २२, रा. कुळधरण, ता. कर्जत), विशाल हंबरड्या काळे (वय २१, रा. चिखली, ता. आष्टी, जि. बीड), किशोर रावण भोसले (वय १९, रा. बाभुळगाव खालसा, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तसेच, एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले. या गुन्ह्यातील आरोपी प्रविण ऊर्फ पप्पू लाला भोसले आणि इतर साथीदारांचा शोध सुरू आहे.CRIME NEWS
मागील सहा महिन्यांत दौंड, बारामती आणि जुन्नर विभागात समान पद्धतीने दरोडे, जबरी चोरी आणि घरफोडीच्या घटना घडत होत्या. १० जून २०२६ रोजी दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार ठिकाणी आणि श्रीगोंदा परिसरात एका ठिकाणी सशस्त्र दरोडे टाकण्यात आले होते. खोरवडी गाव परिसरातील चांभीरनगर, आवडेवस्ती, आवाळेवस्ती आणि खोरवडी येथे रात्रीच्या सुमारास सहा ते सात दरोडेखोरांनी नागरिकांना मारहाण करून, शस्त्रांचा धाक दाखवत सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल फोन आणि मोटारसायकल असा सुमारे ७.१० लाख रुपयांचा ऐवज लुटला होता.CRIME NEWS
या गंभीर घटनांची दखल घेत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी तातडीने स्थानिक गुन्हे शाखा आणि संबंधित पोलीस ठाण्यांची सहा विशेष पथके तयार करून तपास सुरू केला. घटनास्थळांच्या आसपासच्या सुमारे ५० किलोमीटर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी अहिल्यानगर जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर १३ जून रोजी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत वरिल तिघांसह एका विधिसंघर्षित बालाकाला ताब्यात घेण्यात आले. या कारवाई पोलिसांनी सोने - चांदीच्या दागिन्यांसह इतर एकूण २५ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.CRIME NEWS
ही कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार आणि गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर आणि दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पार पाडली. पुढील तपास सुरू आहे.CRIME NEWS
वीसहून अधिक गंभीर गुन्हे उघड
तपासादरम्यान आरोपींनी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील दरोड्याच्या ४, जबरी चोरीच्या ६ आणि घरफोडीच्या ५ अशा एकूण १५ गुन्ह्यांची कबुली दिली. तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील ३ दरोडे, ३ जबरी चोरी आणि २ घरफोडी असे ८ गुन्हे केल्याचेही उघड झाले. अशा प्रकारे आरोपींकडून एकूण २० हून अधिक गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत.CRIME NEWS
आरोपींवर यापूर्वीच गंभीर गुन्हे दाखल
गणेश काळे याच्यावर यापूर्वी दरोडा व चोरीचे ८ गंभीर गुन्हे, विशाल काळे याच्यावर २ गुन्हे, किशोर भोसले याच्यावर १ गुन्हा, तर फरार आरोपी प्रविण भोसले याच्यावर तब्बल ११ गंभीर गुन्हे दाखल
CRIME NEWS




