मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

CRIME NEWS : वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यातील तीन आरोपी अटकेत; ३६ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई

PG
Prashik Ghaste

3 मिनिट वाचन

CRIME NEWS : वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यातील तीन आरोपी अटकेत; ३६ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई

पुणे, महाराष्ट्र मिरर, CRIME NEWS: जबरी चोरी, चेन स्नॅचिंग आणि चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या तीन आरोपींना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा, पारगाव आणि नारायणगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अटक केली आहे. या कारवाईत एकूण ८ गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून, सोन्याचे दागिने आणि इतर असा एकूण ३६ लाख रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.CRIME NEWS

अर्जुन कानिफनाथ भोसले (वय २७, मूळ रा. श्रीरामपूर, सध्या कोपरगाव) , रंगनाथ शेंडगे (वय १९, रा. डोंगरगण, ता. शिरूर), अजय वाळू देवकर (वय २७, रा. कवठे येमाई, देवकरवस्ती, ता. शिरूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.CRIME NEWS

गेल्या दोन महिन्यांत नारायणगाव एसटी स्थानक परिसरात महिला प्रवाशांच्या पर्स व बॅगमधून सोन्याचे दागिने चोरी होण्याच्या घटना घडल्या होत्या. याप्रकरणी नारायणगाव पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते. यामध्ये बोरी खुर्द येथील मीरा शिंदे आणि उंब्रज येथील भागवत गाडगे यांच्या पत्नींच्या पर्समधील सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले होते.CRIME NEWS

या गुन्ह्यांच्या छडा लावण्यासाठी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखा आणि नारायणगाव पोलिसांनी स्वतंत्र पथके तयार करून तपास सुरू केला. यामध्ये घटनास्थळासह परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि मिळालेल्या माहितीनुसार अर्जुन भोसले याला ६ जून रोजी भोसरी परिसरातून ताब्यात घेण्यात आले.
चौकशीदरम्यान त्याने नारायणगाव पोलिस ठाण्यातील दोन्ही चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीतील अंदाजे २७ लाखांचे सुमारे १८ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.CRIME NEWS

दरम्यान, शिरूर, रांजणगाव, शिक्रापूर आणि पारगाव पोलिस ठाण्यांच्या हद्दीत महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून नेण्याच्या आणि जबरी चोरीच्या घटना घडल्या होत्या. या गुन्ह्यांचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखा आणि पारगाव पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण केले. तपासात काळ्या-लाल रंगाच्या पल्सर मोटारसायकलचा वापर झाल्याचे निष्पन्न झाले.
तसेच, मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी शिंगवे परिसरात सापळा रचून ओंकार शेंडगे आणि अजय देवकर यांना ८ जून रोजी अटक केली. चौकशीत त्यांनी पारगाव, शिरूर, शिक्रापूर आणि रांजणगाव पोलिस ठाण्यांतील जबरी चोरी व चेन स्नॅचिंगचे सहा गुन्हे केल्याची कबुली दिली.
या दोघांकडून सुमारे ९ लाख रूपये किंमतीचे सुमारे ६ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली पल्सर मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. दोन्ही आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.दरम्यान, शिरूर, रांजणगाव, शिक्रापूर आणि पारगाव पोलिस ठाण्यांच्या हद्दीत महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून नेण्याच्या आणि जबरी चोरीच्या घटना घडल्या होत्या. या गुन्ह्यांचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखा आणि पारगाव पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण केले. तपासात काळ्या-लाल रंगाच्या पल्सर मोटारसायकलचा वापर झाल्याचे निष्पन्न झाले.

या दोघांकडून सुमारे ९ लाख रूपये किंमतीचे सुमारे ६ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली पल्सर मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. दोन्ही आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.CRIME NEWS

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, नारायणगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण सपांगे, पारगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे, पोलीस उपनिरीक्षक महादेव शेलार तसेच स्थानिक गुन्हे शाखा, नारायणगाव व पारगाव पोलिस ठाण्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पार पाडली.

CRIME NEWS

शेअर करा