मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

CRIME NEWS : चऱ्होलीत इलेक्ट्रिशियनच्या डोक्यात घातला दगड

किरकोळ अपघाताच्या कारणावरून भांडण

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

CRIME NEWS : चऱ्होलीत इलेक्ट्रिशियनच्या डोक्यात घातला दगड

किरकोळ अपघाताच्या कारणावरून भांडण

पिंपरी CRIME NEWS: रस्त्यावरून गाडी वळवत असताना झालेल्या किरकोळ अपघाताच्या कारणावरून एका व्यक्तीने इलेक्ट्रिशियनची कॉलर पकडून त्याच्या डोक्यात दगड मारून गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी (६ जून) सकाळी ११ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास चऱ्होली चौक, सिद्धेश्वर वडेवाले जवळ, चऱ्होली येथे घडली.

याबाबत उमेश मधुकर तांबे (५९, रा. दिघी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार निखील सुभाष काळे (३५, रा. चऱ्होली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.CRIME NEWS

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सिग्नलजवळ आपली गाडी उजवीकडे वळवत होते. त्या वेळी झालेल्या किरकोळ अपघातावरून आरोपी निखील काळे याने फिर्यादीची कॉलर पकडली आणि रस्त्यावर पडलेला दगड त्यांच्या डोक्यात मारला. तसेच त्यांच्या तोंडावर बुक्की मारून गंभीर जखमी केले, ज्यामुळे फिर्यादीला तीन टाके पडले. आरोपीने मारलेला दगड रस्त्यावरून जाणाऱ्या एका रिक्षावर लागल्याने रिक्षाची समोरील काच फुटून नुकसान झाले. दिघी पोलीस तपास करत आहेत.CRIME NEWS

CRIME NEWS

शेअर करा