मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

CRIME NEWS : बारामतीत ज्येष्ठ सीएची ४७.६६ लाखांची फसवणूक

भागीदारीचा हिस्सा नाकारून जीवे मारण्याची धमकी; नातेवाईक सीएविरुद्ध गुन्हा दाखल

PG
Prashik Ghaste

2 मिनिट वाचन

CRIME NEWS : बारामतीत ज्येष्ठ सीएची ४७.६६ लाखांची फसवणूक

भागीदारीचा हिस्सा नाकारून जीवे मारण्याची धमकी; नातेवाईक सीएविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे, महाराष्ट्र मिरर, CRIME NEWS : बारामती शहरामध्ये भागीदारीत चार्टर्ड अकाउंटंट (सीए) फर्म चालवणाऱ्या एका ६९ वर्षीय ज्येष्ठ सीएची तब्बल ४७ लाख ६६ हजार ७८३ रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात एका संशयित नातेवाईक सीएविरुद्ध फसवणूक आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.CRIME NEWS

या गंभीर फसवणूक आणि जीवे मारण्याच्या धमकीप्रकरणी पंढरपूर येथील तिरंगानगर, सोलापूर) येथे वास्तव्यास असणारे संजीव शरदचंद्र कोठाडीया (वय ६९) यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी त्यांचे नातेवाईक आणि व्यावसायिक भागीदार आरोपी प्रतीक देवराज दोशी (रा. बारामती, जी. पुणे) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ५४, २२८, २३३, २३७, १२५, ३१६, ३१८, ३२०, ३२२, ३२३, ३२४, ३३५, ३३६, ३३९, ३४०, ३४४, ३५७ आणि ३५१ अन्वये विश्वासघात, फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा नोंदवला आहे.CRIME NEWS

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा फसवणुकीचा प्रकार ८ फेब्रुवारी २०१३ पासून १५ एप्रिल २०२५ दरम्यान घडला आहे. फिर्यादी संजीव कोठाडीया आणि आरोपी प्रतीक दोशी हे एकमेकांचे जवळचे नातेवाईक आहेत. त्यांनी बारामती शहरामध्ये ‘संजीव कोठाडीया व प्रतीक दोशी अँड कंपनी चार्टर्ड अकाउंटंट्स’ या नावाने भागीदारीत व्यावसायिक फर्म सुरू केली होती.

आरोपी नातेवाईकाने भागीदारी फर्मच्या करारनाम्याचा (डीडचा) वापर करून बँक खाती उघडणे, जीएसटी नोंदणी करणे, आयकर विवरणपत्र (आयटी रिटर्न) भरणे आदी सर्व व्यावसायिक व्यवहार केले. मात्र, भागीदारी फर्मच्या एकूण हिशोबाप्रमाणे फिर्यादी संजीव कोठाडीया यांचा ४७ लाख ६६ हजार ७८३ रुपये ९१ पैसे इतका हिस्सा देण्याची वेळ आली, तेव्हा आरोपी प्रतीक दोशी याने लबाडीच्या इराद्याने “फर्म नोंदणीकृत केलेली नाही” अशी खोटी बतावणी करून हिस्सा देण्यास स्पष्ट नकार दिला. तसेच तडजोडीस नकार देऊन “काय करायचे ते करा, मी परवानाधारक शस्त्रधारी आहे, अपघात घडवून तुमचा केव्हाही गेम करीन” अशी जीवे मारण्याची थेट धमकी दिल्याचे समोर आले आहे.CRIME NEWS

याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अशोक राऊत अधिक तपास करत आहेत.

CRIME NEWS

शेअर करा