Crime News : बँक खात्यांचे जाळे पसरवून देशव्यापी कोट्यवधींची फसवणूक
पुणे, महाराष्ट्र मिरर Crime News : सायबर गुन्हेगारांनी आता फसवणुकीची एक नवी आणि अतिशय चलाख पद्धत (‘मोडस ऑपेरंडी’) अवलंबण्यास सुरुवात केली आहे.
1 मिनिट वाचन

सायबर गुन्हेगारांची नवी ‘मोडस ऑपेरंडी
पुण्यात विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल
पुणे, महाराष्ट्र मिरर Crime News : सायबर गुन्हेगारांनी आता फसवणुकीची एक नवी आणि अतिशय चलाख पद्धत (‘मोडस ऑपेरंडी’) अवलंबण्यास सुरुवात केली आहे. थेट नागरिकांना जाळ्यात ओढण्यासोबतच, हे गुन्हेगार आता विविध बँकांमध्ये खाती उघडून किंवा भाड्याने मिळवून त्या खात्यांचा वापर राज्यभरातील आणि देशभरातील ऑनलाईन ठकबाजीचे पैसे स्वीकारण्यासाठी (म्युले अकाऊंट्स) करत आहेत.Crime News

व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे ब्लॉक ट्रेडिंग, आयपीओ (IPO) खरेदीचे अमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करणे असो, वा इतर सायबर गुन्हे या गुन्ह्यांमधील फसवणुकीची रक्कम या बनावट किंवा भाड्याच्या बँक खात्यांवर वळवली जाते. पुण्यात नुकत्याच समोर आलेल्या अशा सहा विविध प्रकरणांमध्ये कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार उघडकीस आला आहे.Crime News
कोथरूड, समर्थ आणि चतुःश्रृंगी ठाण्यात गुन्हे दाखल
कोथरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीत फेडरल बँकेच्या एका खात्याचा वापर करून देशभरातील नागरिकांची १६,०१,८८९ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, समर्थ पोलीस ठाण्यात बँक ऑफ इंडियाच्या खात्याचा वापर करून हरियाणातील तक्रारदाराचे पैसे हस्तांतरित करून अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. चतुःश्रृंगी हद्दीत कोटक बँकेच्या खात्यात पाच नागरिकांचे ३१ लाख ७२ हजार रुपये वळवून अपहार करण्यात आला आहे.
लष्कर, हडपसर आणि वाघोलीतही लाखो-कोट्यवधींचा गंडा
लष्कर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या खात्याचा वापर करून तेरा नागरिकांचे ३८ लाख ७९ हजार ९२७ रुपये लांबवण्यात आले. हडपसर पोलिसांनी उघडकीस आणलेल्या गुन्ह्यात बँक ऑफ बडोदाच्या एका खात्याद्वारे संघटित सायबर टोळीने ९३ लाखांहून अधिकचे व्यवहार करत चार नागरिकांची तब्बल १कोटी ३२ लाख ७९ हजार ६७४ रुपयांची फसवणूक केली आहे.Crime News
दरम्यान, वाघोली येथे एका ४६ वर्षीय महिलेला व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये ॲड करून ब्लॉक ट्रेडिंग आणि आयपीओ खरेदीच्या बहाण्याने २०लाख ४४ हजार ६४८ रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. या सर्व प्रकरणी पुणे पोलिसांनी सायबर कायद्यानुसार गुन्हे नोंदवले असून अधिक तपास सुरू आहे.
Crime News




