CRIME NEWS : एमबीबीएस प्रवेशाचे अमिष दाखवत लाखोंची फसवणूक
येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ; परप्रांतीय मुख्य आरोपी ताब्यात
1 मिनिट वाचन

येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ; परप्रांतीय मुख्य आरोपी ताब्यात
पुणे CRIME NEWS: एमबीबीएस शिक्षणासाठी नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून विद्यार्थी आणि पालकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. याप्रकरणी परप्रांतीय मुख्य आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
आदित्यकुमार उर्फ अरविंद प्रकाशकुमार आरोगोंडा (वय 47, रा. सिकंदराबाद, तेलंगणा) असे ताब्यात घेण्यात आलेल्याचे नाव आहे.CRIME NEWS

फिर्यादीकडून एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने आदित्यकुमार आरोगोंडा याने ८ लाख १२ हजार रुपये उकळले होते. या प्रकरणी १८ मार्च २०२६ रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.CRIME NEWS
तपासादरम्यान आरोपीविरुद्ध हैदराबाद आणि मुंबई येथेही अशाच प्रकारचे एकूण सहा गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली.
दरम्यान आरोपी मुंबईतील आर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर न्यायालयाच्या वॉरंटवरून त्याला येरवडा पोलिसांनी ताब्यात घेतले.
चौकशीत आरोपीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, महाराष्ट्रातील सुमारे चाळीस विद्यार्थ्यांची फसवणूक करण्यात आल्याची शक्यता असून, आणखी अनेक पीडित समोर येण्याची शक्यता आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर बेरड करत आहेत.CRIME NEWS
अशी करण्यात आली विद्यार्थ्यांची फसवणूक
आरोपीने आपल्या साथीदारांसह EDUVIO Learning Solutions Pvt. Ltd. या नावाने कंपनी स्थापन केल्याचे उघड झाले. सोशल मीडिया, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर जाहिराती देऊन विद्यार्थ्यांना सरकारी किंवा खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन दिले जात होते. प्रवेशासाठी २ ते ५ लाख रुपये ‘कौन्सेलिंग फी’ म्हणून घेतली जात होती. प्रवेश न झाल्यास पैसे परत देण्याचे खोटे आश्वासनही दिले जात होते.CRIME NEWS
कंपनीने तयार केलेल्या ‘Rank Predictor’ आणि ‘College Predictor’ अॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा विश्वास संपादन केला जात होता. त्यानंतर बनावट प्रवेशपत्रे आणि कागदपत्रे देऊन विद्यार्थ्यांची फसवणूक केली जात होती. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया गेल्याचे तपासात उघड झाले आहे.
CRIME NEWS




