मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

CRIME NEWS : रविनंदा ग्रुपचे समीर जैन यांच्याविरुद्द फसवणुकीचा गुन्हा

१५० फ्लॅटधारकांकडून सुमारे ५० कोटी रुपये घेऊनही अनेक वर्षे बांधकाम अपूर्ण

PG
Prashik Ghaste

2 मिनिट वाचन

CRIME NEWS : रविनंदा ग्रुपचे समीर जैन यांच्याविरुद्द फसवणुकीचा गुन्हा

१५० फ्लॅटधारकांकडून सुमारे ५० कोटी रुपये घेऊनही अनेक वर्षे बांधकाम अपूर्ण

पुणे CRIME NEWS: केसनंद येथील गृहनिर्माण प्रकल्पाच्या नावाखाली तब्बल १५० फ्लॅटधारकांकडून सुमारे ५० कोटी रुपये उकळूनही अनेक वर्षे बांधकाम पूर्ण न केल्याप्रकरणी रविनंदा ग्रुपच्या संचालकाविरोधात वाघोली पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.CRIME NEWS

या प्रकरणात समीर रवींद्र जैन (रा. मार्केटयार्ड) यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत असोसिएशन ऑफ पर्सन्स – रविनंदा टॉवर्सचे अध्यक्ष सुखजितसिंग निर्मलसिंग सैनी (रा. शुक्रवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे.

केसनंद येथील जमीन मालक व शेतकऱ्यांसोबत करार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर जैन हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांनी केसनंद येथील जमीन मालक व शेतकऱ्यांसोबत २९ जुलै २०१५ रोजी जॉईंट व्हेंचर करार केला होता. या करारानुसार जमीन मालकांना ४० टक्के आणि विकसकाला ६० टक्के हिस्सा देण्याचे ठरले होते. आवश्यक परवानग्या जिल्हाधिकारी कार्यालय आणि पीएमआरडीएकडून घेण्यात आल्यानंतर ‘रविनंदा लँडमार्क्स युनिट-५’ या व्यापारी व निवासी प्रकल्पाची घोषणा करण्यात आली.CRIME NEWS

कोविड काळात काम ठप्प झाले
पाच वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे आश्वासन देत फ्लॅट बुकिंग सुरू करण्यात आले. प्रकल्पातील ए, बी, सी आणि डी टॉवर्समध्ये फ्लॅट घेण्यासाठी सुमारे १५० नागरिकांनी नोंदणी केली. सुरुवातीला बांधकामास सुरुवात झाली व काही टॉवर्समध्ये सातव्या मजल्यापर्यंत स्लॅबचे कामही पूर्ण करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर कोविड काळात काम ठप्प झाले आणि पुढे बांधकामाला गती मिळाली नाही.

फ्लॅटधारकांनी वारंवार पाठपुरावा करूनही प्रकल्प पूर्ण करण्यात आला नाही. त्यामुळे ग्राहकांनी एकत्र येत ‘असोसिएशन ऑफ पर्सन्स – रविनंदा टॉवर्स’ची स्थापना केली आणि प्रकल्पाबाबत सातत्याने पाठपुरावा केला. मात्र, त्यातूनही कोणताही तोडगा न निघाल्याने अखेर फ्लॅटधारकांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.CRIME NEWS

आर्थिक फसवणुकीचा आरोप
तक्रारीनुसार, समीर जैन यांनी प्रकल्पातील सुमारे १५० फ्लॅटधारकांकडून अंदाजे ५० कोटी रुपये स्वीकारले; मात्र त्यांना फ्लॅटचा ताबा दिला नाही किंवा प्रकल्प पूर्ण केला नाही. त्यामुळे मोठ्या आर्थिक फसवणुकीचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.CRIME NEWS

या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मोहन खांदारे करीत आहेत. तपासादरम्यान प्रकल्पातील आर्थिक व्यवहार, ग्राहकांकडून घेतलेली रक्कम आणि बांधकामाची सद्यस्थिती यांची सखोल चौकशी केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

CRIME NEWS

शेअर करा