मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

CRIME NEWS :सराईताकडून चार दुचाकी जप्त

पुणे, महाराष्ट्र मिरर, CRIME NEWS : एका सराईताला शिक्रापूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड करत त्याच्या ताब्यातील चोरीच्या सुमारे ९५ हजार रुपये किमतीच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

CRIME NEWS :सराईताकडून चार दुचाकी जप्त

पुणे, महाराष्ट्र मिरर, CRIME NEWS: एका सराईताला शिक्रापूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड करत त्याच्या ताब्यातील चोरीच्या सुमारे ९५ हजार रुपये किमतीच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.CRIME NEWS

योगेश ज्ञानेश्वर जाधव (वय २७) असे अटक केलेल्याचे नाव आहे. मनोज टेमगिरे (रा. बुरुजवाडी, मलठण रोड, ता.शिरूर) यांनी याबाबत फिर्याद दिली होती.CRIME NEWS

शिक्रापूर परिसरात सातत्याने वाढत असलेल्या दुचाकी चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही कारवाई केली. फिर्यादी मनोज टेमगिरे यांची हिरो स्प्लेंडर प्लस ही दुचाकी चोरट्याने लंपास केली होती. या घटनेनंतर परिसरात वाढलेल्या दुचाकी चोरीच्या घटनांची पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दखल घेत तपासाला वेग देण्याचे आदेश गुन्हे शोध पथकाला दिले. त्यानुसार शिक्रापूर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक आणि स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांच्या संयुक्त पथकाने मिळालेली माहिती, तांत्रिक माहिती आणि संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवत तपास सुरू केला. तपासादरम्यान रेकॉर्डवरील चौदा गुन्ह्यातील आरोपी योगेश जाधव याला संशयावरून ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने शिक्रापूरसह इतर ठिकाणी दुचाकी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून ९५ हजार रुपये किमतीच्या चार चोरीच्या दुचाकी जप्त केल्या.CRIME NEWS

ही कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे, पोलीस हवालदार जनार्धन शेळके, तुषार पंदारे, संज ु जाधव, विकास पाटील, सागर धुमाळ रोहीदास पारखे, श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, शिवाजी चितारे, अमोल नलगे, बाप ु हडागळे, नारायण वाळके, राम जाधव, मच्छिंद्र निचीत यांच्या पथकाने केली. पोलीस हवालदार बापू हाडगळे पुढील तपास करीत आहेत.

CRIME NEWS

शेअर करा