CRIME NEWS : कोयत्यासह तडीपार गुंडाला अटक
मोशी टोलनाका येथे पोलिसांची कारवाई
PG
Prashik Ghaste
1 मिनिट वाचन

मोशी टोलनाका येथे पोलिसांची कारवाई
पिंपरी, महाराष्ट्र मिरर, CRIME NEWS: तडीपारी आदेशाचा भंग करून शहरात आलेल्या एका गुंडाला पोलिसांनी कोयत्यासह अटक केली. ही कारवाई गुरुवारी (११ जून) रोजी रात्री पावणेआठच्या सुमारास मोशी टोल नाका येथे करण्यात आली.CRIME NEWS

गुंडाविरोधी पथकातील पोलीस शिपाई ज्ञानेश्वर गिरी यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, आशिष प्रकाशराव शेळके (२७, रा. मोशी) या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.CRIME NEWS
आरोपीला परिमंडळ-३ मधून तडीपार करण्यात आले होते. तरीही त्याने बंदी आदेशाचे उल्लंघन करून मोशी टोलनाक्याजवळ ५०० रुपये किमतीचा लोखंडी कोयता बाळगला.
भोसरी एमआयडीसी पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
CRIME NEWS




