मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

CRIME NEWS : ट्रॅफिक नोटीसची बनावट एपीके फाईल पाठवून सव्वा लाख लुटले

ॲक्सेस मिळवत क्रेडिट कार्डद्वारे लाटली ऑनलाईन रक्कम

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

CRIME NEWS : ट्रॅफिक नोटीसची बनावट एपीके फाईल पाठवून सव्वा लाख लुटले

ॲक्सेस मिळवत क्रेडिट कार्डद्वारे लाटली ऑनलाईन रक्कम

पिंपरी, CRIME NEWS: मोबाईलवर ट्रॅफिक नोटीसची बनावट लिंक आणि एपीके फाईल पाठवून मोबाईलचा संपूर्ण ॲक्सेस मिळवत क्रेडिट कार्डद्वारे ऑनलाईन आर्थिक फसवणूक केली. ही घटना गुरुवार (४ जून) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास दत्तवाडी, आकुर्डी येथे घडली.CRIME NEWS

या प्रकरणात रवीकेशव ठाकुर (३६, रा. आकुर्डी; सध्या-  सोमाटणे, मावळ) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वेगवेगळ्या मोबाईल नंबर वापरणाऱ्या तीन अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.CRIME NEWS

अज्ञात व्यक्तीने फिर्यादीच्या व्हाट्सॲपवर कारच्या चलनाचे बिल भरण्यासंदर्भात मेसेज पाठवून खाली एमपरिवहन एपिके नावाची फाईल पाठवली. फिर्यादीने ती फाईल डाउनलोड करताच त्यांचा मोबाईल हॅक झाला. त्यानंतर आरोपींनी मोबाईलचा ॲक्सेस मिळवून फिर्यादीच्या आयसीआईसीआय आणि एसबीआय क्रेडिट कार्डचा वापर करत फ्लिपकार्टवरून दोन मोबाईल फोन खरेदी केले आणि एकूण १,१८,८२३ रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. निगडी पोलीस तपास करत आहेत.

CRIME NEWS

शेअर करा