CRIME NEWS : ट्रॅफिक नोटीसची बनावट एपीके फाईल पाठवून सव्वा लाख लुटले
ॲक्सेस मिळवत क्रेडिट कार्डद्वारे लाटली ऑनलाईन रक्कम
1 मिनट पठन

ॲक्सेस मिळवत क्रेडिट कार्डद्वारे लाटली ऑनलाईन रक्कम
पिंपरी, CRIME NEWS: मोबाईलवर ट्रॅफिक नोटीसची बनावट लिंक आणि एपीके फाईल पाठवून मोबाईलचा संपूर्ण ॲक्सेस मिळवत क्रेडिट कार्डद्वारे ऑनलाईन आर्थिक फसवणूक केली. ही घटना गुरुवार (४ जून) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास दत्तवाडी, आकुर्डी येथे घडली.CRIME NEWS

या प्रकरणात रवीकेशव ठाकुर (३६, रा. आकुर्डी; सध्या- सोमाटणे, मावळ) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वेगवेगळ्या मोबाईल नंबर वापरणाऱ्या तीन अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.CRIME NEWS
अज्ञात व्यक्तीने फिर्यादीच्या व्हाट्सॲपवर कारच्या चलनाचे बिल भरण्यासंदर्भात मेसेज पाठवून खाली एमपरिवहन एपिके नावाची फाईल पाठवली. फिर्यादीने ती फाईल डाउनलोड करताच त्यांचा मोबाईल हॅक झाला. त्यानंतर आरोपींनी मोबाईलचा ॲक्सेस मिळवून फिर्यादीच्या आयसीआईसीआय आणि एसबीआय क्रेडिट कार्डचा वापर करत फ्लिपकार्टवरून दोन मोबाईल फोन खरेदी केले आणि एकूण १,१८,८२३ रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. निगडी पोलीस तपास करत आहेत.
CRIME NEWS
