मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

हडपसरमध्ये सव्वा दोन लाखांची तांब्याची वायर लंपास

बांधकामाच्या साईटवर घडली घटना

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

हडपसरमध्ये सव्वा दोन लाखांची तांब्याची वायर लंपास

बांधकामाच्या साईटवर घडली घटना

पुणे: हडपसरमधील माळवाडी परिसरात असलेल्या एका नामांकित कंपनीच्या बांधकामाच्या ठिकाणाहून (साईट अज्ञात चोरट्यांनी २ लाख २० हजार रुपये किमतीची तांब्याची वायर चोरून नेली आहे. डीपी रोडवर असलेल्या ‘हॉलीस्टीको’ कंपनीच्या साईटवर ही चोरी झाली असून, याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी हांडेवाडी (काळेपडळ) येथे राहणाऱ्या एका ४४ वर्षीय सुरक्षा अधिकाऱ्याने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) नुसार गुन्हा नोंदवला आहे. ही घटना शनिवारी (ता. २) रात्री साडे नऊच्या सुमारास घडली.

सुरक्षा व्यवस्था भेदून चोरी
मिळालेल्या माहितीनुसार, माळवाडी येथील डीपी रोडवर हॉलीस्टीको (एस्ट्राना) कंपनीच्या इमारतीचे काम सुरू आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वायरिंगचे काम सुरू असल्याने तांब्याच्या वायरचे बंडल ठेवण्यात आले होते. शनिवारी रात्री साडे नऊच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी साईटच्या उत्तर दरवाजाच्या (नॉर्थ गेट) बाजूने प्रवेश केला आणि तिथून २ लाख २० हजार रुपये किमतीची तांब्याची वायर चोरून नेली.

कंपनीच्या सुरक्षा अधिकाऱ्याची तक्रार
फिर्यादी हे या ठिकाणी सुरक्षा अधिकारी म्हणून कामाला आहेत. साईटवर कामासाठी लागणारे साहित्य चोरीला गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी कंपनीच्या वरिष्ठ पातळीवर माहिती देऊन पोलिसांत तक्रार दाखल केली. या भागात सध्या मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू असल्याने अशा प्रकारच्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.

हडपसर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले जात आहे. पोलीस अंमलदार खटके या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

शेअर करा