मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

पालिकेच्या मिळकतींची माहिती संकलित करा: ओमप्रकाश दिवटे

यापूर्वीही असे आदेश काढले गेले होते परंतु त्यांची अंमलबजावणी झाली नाही

PG
Prashik Ghaste

2 मिनिट वाचन

पालिकेच्या मिळकतींची माहिती संकलित करा: ओमप्रकाश दिवटे

यापूर्वीही असे आदेश काढले गेले होते परंतु त्यांची अंमलबजावणी झाली नाही

अनेकवेळा त्या-त्या भागातील नगरसेवक या मिळकतींचा ताबा स्वतःकडे ठेवतात. मात्र, याबाबतची माहिती दिल्यानंतर माननीयांचा रोष पत्कारावा लागेल. हे टाळण्यासाठी माहिती दिली जात नव्हती.

निलेश राऊत
पुणे: पुणे महापालिकेमधील सर्व क्षेत्रीय कार्यालय तसेच पुणे महापालिकेमधील विविध विभागांकडे ताब्यात असलेल्या मालमत्तांची २१ मुद्द्यांची माहिती सर्वांनी अद्ययावत करावी. याकरिता पुणे महापालिकेकडील मालमत्ता जतन, संरक्षण, देखभाल, विनियोग, संचलन करण्याकरिता सर्व मालमत्तेचे सर्वेक्षण करून एकत्रित डेटाबेस तयार करावा, जेणेकरून सदर मालमत्तांचा प्रभावीपणे विनियोग करणे शक्य होईल. अशा सूचना अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

महापालिकेच्या मालकीच्या मिळकतींची माहिती पाठवण्याचे आदेश यापूर्वी अनेकवेळा विविध उपायुक्तांनी क्षेत्रीय कार्यालयांना दिले होते. मात्र, दरवेळी क्षेत्रीय कार्यालयांनी या आदेशांना कात्रजचा घाट दाखवला आहे.

त्यानंतर आता पुन्हा एकदा अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन महापालिकेच्या मिळकतींचे सर्वेक्षण करून माहिती संकलन करण्याचे आदेश दिले आहेत. महापालिकेच्या कारभारामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी आणि जबाबदारीचे विकेंद्रीकरण करण्यासाठी १५ क्षेत्रीय कार्यालयांची निर्मिती करण्यात आली आहे. भविष्यात ही संख्या वाढणार आहे. क्षेत्रीय कार्यालयांचा कारभार पाहण्यासाठी सहायक आयुक्तांची नियुक्ती केली आहे. तसेच तीन क्षेत्रीय कार्यालयांचा मिळून एक झोन तयार करून त्याची जबाबदारी उपायुक्तांवर देण्यात आली आहे. यांसह महापालिकेच्या सर्व खात्याचे वेगवेगळे विभाग क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर निर्माण करून त्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.

क्षेत्रीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रातील अॅमिनिटी स्पेस, अंगणवाडी, आरोग्य कोठी, व्यायाम शाळा, समाज मंदिर, दवाखाने, विरंगुळा केंद्र, कचरा रॅम्प, स्मशानभूमी, दफनभूमी, संपर्क कार्यालये, जकात नाका, शाळा, उद्याने, नदीघाट, जलतरण तलाव, सामाजिक सभागृह, क्रीडा संकुल, मोकळ्या जागा, सदनिका, योगा केंद्र, व्यावसायिक गाळे अशा मिळकती आहेत. यातील काही मिळकतींचा ताबा मालमत्ता विभागाकडे तर काही मिळकतींचा ताबा क्षेत्रीय कार्यालये व संबंधित विभागांकडे असतो.

मात्र, अनेकवेळा त्या-त्या भागातील नगरसेवक या मिळकतींचा ताबा स्वतःकडे ठेवतात. यासाठी सामाजिक संस्थांचा आधार घेतला जातो. यापूर्वी अनेक उपायुक्तांनी आपल्या हद्दीतील मिळकतींची माहिती पाठवण्याचे आदेश क्षेत्रीय कार्यालयांना दिले. मात्र, याबाबतची माहिती दिल्यानंतर माननीयांचा रोष पत्कारावा लागेल. हे टाळण्यासाठी मिळकतींची माहिती दिली जात नव्हती. यानंतर आता पुन्हा एकदा अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन महापालिकेच्या मिळकतींचे सर्वेक्षण करून माहिती संकलन करण्याचे आदेश दिले आहेत.

सदर मालमत्तांची एकत्रित माहिती प्रणाली विकसित करण्याच्या अनुषंगाने आणि भाडेपट्टा व महसूल व्यवस्थापन यामधील त्रुटी दूर करण्याकरिता EMAMS प्रणाली लागू करण्याच्या अनुषंगाने तसेच मालमत्ता व्यवस्थापन प्रणाली मध्ये मूलभूत सुधारणा करण्याकरीता संगणक आज्ञावली विकसित करण्याबाबत कार्यवाही सुरू करण्यात येत आहे.

सदर प्रणाली मध्ये सर्व मालमत्तांचे सर्वेक्षण जीआयएस मॅपिंग, डिजिटायझेशन, मूल्यांकन, सिंगल विंडो प्लॅटफॉर्म, पेमेंट गेटवे, सिस्टीम मॉनिटरिंग आणि रिपोर्टिंग करिता डॅशबोर्ड देखील विकसित करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. सदर प्रणाली विकसित झाल्यानंतर सर्व मालमत्तांची सविस्तर माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होऊन प्रभावीपणे पुढील नियोजन करणे शक्य होणार आहे.

Collect information on municipal assets: Omprakash Divate

शेअर करा