मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Delhi News : नवी दिल्लीत 'सीजेपी'च्या नेत्यांवर पुन्हा कारवाई; बाँड लिहून देऊनही 'जंतर मंतर' आंदोलन प्रकरणी तुरुंगात रवानगी

Delhi News :नवी दिल्ली: कॉकरोच जनता पार्टी (CJP) या राजकीय पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके तसेच नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांना अखेर तुरुंगात जावे लागले आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

नवी दिल्लीत 'सीजेपी'च्या नेत्यांवर पुन्हा कारवाई; बाँड लिहून देऊनही 'जंतर मंतर' आंदोलन प्रकरणी तुरुंगात रवानगी
नवी दिल्लीत 'सीजेपी'च्या नेत्यांवर पुन्हा कारवाई; बाँड लिहून देऊनही 'जंतर मंतर' आंदोलन प्रकरणी तुरुंगात रवानगी

Delhi News :नवी दिल्ली: कॉकरोच जनता पार्टी (CJP) या राजकीय पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके तसेच नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांना अखेर तुरुंगात जावे लागले आहे. मागील आठवड्यात दिल्ली पोलिसांनी या नेत्यांना अटक केली होती. त्यानंतर, 'पुढील वर्षभर कोणतेही हिंसक आंदोलन करणार नाही' असा हमीपत्र (बॉंड) कोर्टात लिहून दिल्यानंतर पोलिसांनी त्यांची सुटका केली होती. परंतु, न्यायालयीन हमीपत्र दिल्यानंतर काही दिवसांतच त्यांनी पुन्हा आंदोलन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.https://maharashtramirror.com/ Delhi News

जंतर मंतर हे ठिकाण अधिकृत आंदोलनस्थळांच्या यादीतून वगळण्यात आले आहे. असे असतानाही, या निर्णयाच्या दुसऱ्याच दिवशी कॉकरोच जनता पार्टीच्या या नेत्यांनी हातात तिरंगा ध्वज घेत जंतर मंतरच्या दिशेने कूच केले आणि घोषणाबाजी सुरू केली.

प्रतिबंधित क्षेत्रात आंदोलन केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी तातडीने पावले उचलत सौरव दास, आशुतोष रांका आणि अजिंक्य शिंदे यांना मंगळवारी ताब्यात घेतले. पोलिसांच्या आदेशाचा अवमान करणे आणि शासकीय नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्षभर शांतता राखण्याचे दिलेले आश्वासन मोडून नियमभंग केल्यामुळे या नेत्यांची अखेर तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा