मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Civic News : निंबजनगर, विठ्ठलनगरसह एकतानगरी पूरमुक्त करण्यासाठी उपाययोजना करा

पुणे, महाराष्ट्र मिरर Civic News : सिंहगड रस्ता परिसरातील निंबजनगर, विठ्ठलनगर आणि एकतानगरी या भागांमध्ये दरवर्षी उद्भवणाऱ्या पूरस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महापौर मंजुषा नागपुरे यांनी पुणे महापालिका, पाटबंधारे विभाग आणि तांत्रिक अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन परिस्थितीचा सविस्तर आढावा घेत

VZ
vidula zagade

1 मिनिट वाचन

Civic News : निंबजनगर, विठ्ठलनगरसह एकतानगरी पूरमुक्त करण्यासाठी उपाययोजना करा

महापौर मंजुषा नागपूरे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

पुणे, महाराष्ट्र मिरर Civic News : सिंहगड रस्ता परिसरातील निंबजनगर, विठ्ठलनगर आणि एकतानगरी या भागांमध्ये दरवर्षी उद्भवणाऱ्या पूरस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महापौर मंजुषा नागपुरे यांनी पुणे महापालिका, पाटबंधारे विभाग आणि तांत्रिक अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. नागरिकांच्या जीवित आणि मालमत्तेच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत तातडीच्या तसेच दीर्घकालीन उपाययोजना राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले.Civic News

बैठकीत निंबजनगर, विठ्ठलनगर आणि एकतानगरी परिसरातील पूरस्थितीची कारणे, बाधित क्षेत्रांचे नकाशे, नदीपात्रातील अडथळे, पाण्याच्या प्रवाहातील अडचणी, संरक्षण भिंतींची गरज आणि भविष्यात पूरस्थितीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आवश्यक अभियांत्रिकी उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

महापौर मंजुषा नागपुरे म्हणाल्या, “दरवर्षी या परिसरातील नागरिकांना पुरामुळे आर्थिक नुकसान, मालमत्तेची हानी आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. ही परिस्थिती कायमस्वरूपी बदलणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. नागरिकांना दरवर्षी पुराच्या संकटाचा सामना करावा लागू नये, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजना तातडीने राबवाव्यात. या प्रश्नात कोणतीही दिरंगाई किंवा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही.”Civic News

बैठकीत पूरप्रवण क्षेत्रांचे तांत्रिक सर्वेक्षण करून सविस्तर कृती आराखडा तयार करणे, नदीपात्रातील अडथळे दूर करून पाण्याचा नैसर्गिक प्रवाह सुरळीत करणे, आवश्यक ठिकाणी संरक्षण भिंती (Retaining Wall) उभारण्याचा प्रस्ताव तयार करणे, पुणे महानगरपालिका व पाटबंधारे विभागाने संयुक्तपणे अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजनांची अंमलबजावणी करणे तसेच कामांच्या प्रगतीचा नियमित आढावा घेऊन निश्चित कालमर्यादेत सर्व कामे पूर्ण करण्यावर भर देण्यात आला.

यावेळी महापौर नागपुरे यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सांगितले की, “नागरिकांचा विश्वास जपणे आणि त्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. निंबजनगर, विठ्ठलनगर आणि एकतानगरी परिसर कायमस्वरूपी पुरमुक्त करण्यासाठी आवश्यक असलेली प्रत्येक उपाययोजना प्राधान्याने आणि वेळेत पूर्ण करण्यात यावी.”Civic News

या बैठकीस पुणे महापालिकेचे शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, अधीक्षक अभियंता प्रवीण शेंडे आणि उपअभियंता देवराम पंडित उपस्थित होते.Civic News

Civic News

शेअर करा